कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
![]()
कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन
उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
अमळनेर प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच सामाजिक, शैक्षणिक व विविध संघटनांमध्ये ते कार्यरत होते. उत्कृष्ट संघटक तसेच शिक्षकांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सर यांची ओळख होती.
कै. जगदाळे सर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल, पारोळा होते. अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. २०/८/२०२६, वार गुरुवारी सकाळी ९ वाजता राहत्या घरून, अंमळनेर येथून निघणार आहे.
शिक्षण क्षेत्रासह सामाजिक व विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील.
(माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी यांच्या वतीने कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐)

