आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त १८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन
![]()
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त १८ डिसेंबर रोजी
जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव, दि.१६ डिसेंबर – : संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत जाहीरनामा स्वीकारला असून, त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा केला जातो.
शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या निर्देशानुसार यावर्षीही जिल्हास्तरावर अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे “अल्पसंख्यांक हक्क दिवस” जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये दिली आहे.
या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती देण्यात येणार आहे.अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी मोठया संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या हक्कांविषयी माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या निमित्ताने शाळा व महाविद्यालयांमध्ये भित्तीपत्रक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद अशा विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

