कै. रविंद्र आनंदा पाटील यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरात शोककळा आज सकाळी 11 वाजता तांबेपुरा येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()
कै. रविंद्र आनंदा पाटील यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरात शोककळा
आज सकाळी 11 वाजता तांबेपुरा येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील आदरणीय, समाजशील व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कै. रविंद्र आनंदा पाटील (रा. तांबेपुरा, अमळनेर) यांचे दि. 10 ऑक्टोबर 2025, शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरासह अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.
ते अंबिका मंगल कार्यालयाचे संचालक श्री. कैलास आनंदा पाटील व श्री. विलास आनंदा पाटील यांचे मोठे बंधू तसेच राहुल रवींद्र पाटील यांचे वडील होत. त्यांच्या सौम्य स्वभावाने, मनमिळाऊ वृत्तीने आणि सामाजिक बांधिलकीने त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक 11 ऑक्टोबर 2025, शनिवार रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, तांबेपुरा, अमळनेर येथून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांती 🙏🕊️
(मराठी लाईव्ह न्युज परिवाराच्यावतीने कै. रविंद्र आनंदा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.)

