गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
1 min read

गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Loading

गुरूवंदनेतून व्यक्त झाला कृतज्ञतेचा भाव; जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांच्या पुढाकारातून गुरुजनांचा सत्कार; संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन व्यक्त केला सन्मान

नाशिक प्रतिनिधी :
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे गुरुवंदनेचा प्रेरणादायी आणि भावनिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पशुधन पर्यवेक्षक तथा माजी सभापती पंचायत समिती अमळनेर डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नाशिक विभागातील विविध क्षेत्रातील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ सर्जन, संशोधक तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक यांना एकत्रित निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा अनोखा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश आहेर (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नाशिक), श्री संदीप पवार (पशुधन विकास अधिकारी, संजयगाव, ता. इगतपुरी – तज्ज्ञ सर्जन), डॉ. सचिन बेंद्रे (पशुधन विकास अधिकारी, गिरणारे, जि. नाशिक – विशेष सर्जन), डॉ. वैभव आहेर (पशुधन विकास अधिकारी, गट-अ), डॉ. प्रतिभा कोरे (पशुधन विकास अधिकारी, गट-अ, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक – विशेष सर्जन), डॉ. आंबोली सातारकर (पशुधन विकास अधिकारी, गट-अ, प्रादेशिक विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक), डॉ. रवींद्रनाथ निमसे (पशुसंवर्धन विभाग प्रमुख, शेळी-मेंढी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी), डॉ. लक्ष्मण रंभाजी धोंडे (पशुधन विकास अधिकारी – विशेष सर्जन व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर), श्री सुनील (मामा) गायकवाड (परिचर व ज्येष्ठ मार्गदर्शक), श्री शरद लोखंडे (ड्रेसर), श्री महेश सोनार (ज्युनिअर क्लर्क) तसेच श्री भगवान बोडाई (परिचर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देऊन गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, आपल्या दीर्घ सेवाकाळात इतक्या उत्साहात आणि आदरपूर्वक गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याचे सांगितले.

या प्रसंगी डॉ. दिपक पाटील यांनी उपस्थित सर्व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी डॉ. कु. पल्लवी भोये, कु. दीक्षा पांडे, दानिश पटेल, मंगेश पालवी, सोमनाथ शिंदे, प्रणव तेजाडे, शुभम सपकाळे आणि पवन गवळी यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.

भावनिक प्रतिक्रिया

कार्यक्रमावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुनील (मामा) गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात अनेक प्रशिक्षणार्थी डॉक्टर येथे प्रशिक्षण घेऊन यशस्वी झाले. मात्र डॉ. दिपक पाटील यांनी आयोजित केलेल्या या गुरुपौर्णिमा सोहळ्यात आम्हाला जो मान-सन्मान दिला, तो आमच्या संपूर्ण सेवाकाळातील पहिलाच अनुभव आहे. हा अविस्मरणीय क्षण आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवू.”
गुरूंच्या ऋणाची जाणीव करून देणारा, गुरु-शिष्य परंपरेचा गौरव वाढविणारा आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *