आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकित झाला ठराव.
1 min read

आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकित झाला ठराव.

Loading

आमदार अनिल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकित झाला ठराव.

जळगाव:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक पक्षाचे ॲड.नाझेर काझी (राज्यप्रमुख- अल्पसंख्याक सेल) यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
सदर बैठकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे असा एकमुखी ठराव पारित करण्यात आला.
या बैठकीत जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत तसेच पक्षविस्ताराच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवरही सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रमुख मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी ठाम मागणी एकमुखाने केली. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे तसेच निवेदन सादर करून ही मागणी राज्यप्रमुखांसमोर मांडली.
या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, तसेच शहराध्यक्ष कलीम शेख यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला. उपस्थित कार्यकर्त्यांनीही या घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमदार पाटील यांना मंत्रिपद द्यावे, असा ठराव एकमुखाने मंजूर केला.
या प्रसंगी मा. मंत्री गुलाबराव देवकर, आमदार मनीष जैन, जळगाव लोकसभा अध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे, पक्ष नेत्या प्रतिभा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन संयोजकांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले. बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठक संपल्यानंतर उपस्थित सर्वांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंदाबाद”, “अजितदादा पवार यांचे नेतृत्व अमर रहे”, आणि “दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांना मंत्री करा” अशा घोषणा देत सभागृह दुमदुमून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *