1 min read

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक जामनेर येथे १२ ऑक्टोबरला

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक जामनेर येथे १२ ऑक्टोबरला

जामनेर (प्रतिनिधी) –
माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवाशर्ती, प्रशासनातील अडचणी, तसेच संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांच्यातर्फे एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी २ वाजता, कन्या माध्यमिक विद्यालय, वाकी रोड, बसस्थानक मागे, जामनेर येथे होणार आहे.

या बैठकीत जिल्हास्तरीय सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच तालुकास्तरावरील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, समन्वयक तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष श् पी. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे.

बैठकीला समन्वय समिती मार्गदर्शक पी. एस. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह. दलाल, शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधान महाजन, डॉ. मिलिंद बागुल, शुद्धोधन सोनवणे, डॉ. संजू भटकर, सुरेश अहिरे, सुनील वानखेडे, प्रभाकर बोरसे तसेच समितीचे पदाधिकारी व महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीतील मुख्य मुद्दे:
1. सेवाशर्ती व प्रलंबित मागण्या
2. शाळांतील प्रशासनिक/शैक्षणिक अडचणी व उपाययोजना
3. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न
4. आगामी आंदोलने / निवेदने / शिष्टमंडळ भेटी

या बैठकीत विविध तक्रारी, समस्या, व प्रलंबित प्रस्तावांविषयी उपसंचालक, संचालक व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग स्तरावर पाठपुरावा करून योग्य त्या उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत.

जामनेर तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी ज्यांच्या शिक्षण विभागाशी निगडित समस्या तक्रारी प्रलंबित प्रश्न असतील त्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे. तसेच समन्वय समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संघटनेच्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री डी. एस. पाटील (जामनेर) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *