सोनगीर ग्रामस्थांवर शोककळा — श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे तिरुपती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन,  उद्या सोनगिर येथून राहत्या घरून निघणार अंतयात्रा
1 min read

सोनगीर ग्रामस्थांवर शोककळा — श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे तिरुपती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, उद्या सोनगिर येथून राहत्या घरून निघणार अंतयात्रा

Loading

सोनगीर ग्रामस्थांवर शोककळा — श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे तिरुपती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उद्या सोनगिर येथून राहत्या घरून निघणार अतंयात्रा

सोनगिर प्रतिनिधी
सोनगीर (ता. धुळे) येथील श्री विठ्ठल भिका माळी (टेलर) यांचे आज दिनांक 7 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 10 वाजता, श्री तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या जाण्याने सोनगीर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वभावाने ते मितभाषी, प्रेमळ आणि मदतीस तत्पर होते. त्यांचा मित्रपरिवाराचा गोतावळा मोठा होता. आपुलकीने वागणारे, सर्वांना जोडून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या अंत्ययात्रा उद्या, दिनांक 8 ऑक्टोबर बुधवार दुपारी, राहत्या घरापासून (भाजी मार्केट जवळ) निघणार आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा आप्तवर्ग आहे.

शोकाकुल:
सुरेश विठ्ठल माळी, योगेश विठ्ठल माळी, रमेश विठ्ठल माळी, श्याम निंबा माळी, रामू निंबा माळी, योगेश बापू माळी
समस्त बिलाडे परिवार, सोनगीर

 

🕊️ मराठी लाईव्ह न्युज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🕊️
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. 🙏💐

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *