‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेच्या युट्युब प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाचे योगदान  समाजसुधारक फुले दाम्पत्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुमारे सहा लाखांचा निधी सुपूर्त
1 min read

‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेच्या युट्युब प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाचे योगदान समाजसुधारक फुले दाम्पत्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुमारे सहा लाखांचा निधी सुपूर्त

Loading

सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेच्या युट्युब प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाचे योगदान

समाजसुधारक फुले दाम्पत्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुमारे सहा लाखांचा निधी सुपूर्त

धुळे प्रतिनिधी
: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची, विचारांची आणि समाजपरिवर्तनाच्या तळमळीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निर्मितीतून साकारलेल्या ‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ या मालिकेच्या युट्युबवरील प्रसारणासाठी धुळे जिल्हा माळी समाजाच्या वतीने महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले.

फुले दाम्पत्याने समाजातील वंचित, शोषित आणि महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य, सामाजिक विषमतेविरोधातील त्यांचा संघर्ष तसेच शिक्षण आणि समतेचा दिलेला संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ही मालिका अखंड सुरू राहावी आणि तिच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची विचारधारा व्यापक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी धुळे जिल्ह्यातील माळी समाजबांधवांनी एकत्र येत आर्थिक योगदान दिले.

या उपक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील अनेक समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत साधारण सहा लाख रुपयांपर्यंतचा निधी जमा केला. हा निधी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. समाजाच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य आणि विचार दृक्-श्राव्य माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नाला समाजबांधवांनी दिलेले हे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे
याप्रसंगी अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
विलासराव पाटील ,खासदार डॉ अमोल कोल्हे,व कार्यक्रम चे अध्यक्ष डॉ सुशील महाजन यांनी मार्गदर्शन केले.

निधी संकलनासाठी मान्यवरांचा पुढाकार

या निधी संकलनासाठी माळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हनुमंतजी वाडीले, उद्यान पंडित विलासजी माळी,
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासराव पाटील सर,प्राचार्य बी.एच. जाधव, डॉ सुशिल महाजन,
प्रा. अनिल कुमार बोरसे, प्राचार्य व्ही.बी. पाटील, श्री. मुन्नाभाऊ वाडीले, श्री. कैलास बागुल, डॉ. सुनील वाघ, श्री. हरिश्चंद्र रेंडे, श्री. संदीप माळी सर, श्री. काशिनाथ माळी सर, श्री. अनिल वाघ रावसाहेब, श्री. किशोर माळी सर, श्री. किशोर भाऊ माळी, श्री. किशोर आप्पा सूर्यवंशी, श्री. सुमित भाऊ चौधरी, श्री. हितेंद्र माळी, श्री. हितेश माळी, श्री. ज्ञानेश्वर बोरसे सर आणि श्री. ईश्वर जाधव सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची जबाबदारीही मान्यवरांनी सांभाळली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य व्ही.बी. पाटील यांनी केले. प्राचार्य बी.एच. जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर प्रा. अनिल कुमार बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

योगदान देणाऱ्या समाजबांधवांचे आभार

‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेचे प्रसारण अखंड सुरू राहावे आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या सामाजिक भावनेतून योगदान देणाऱ्या सर्व समाजबांधवांचे धुळे जिल्हा माळी समाजाच्या वतीने आयोजकांनी हार्दिक आभार मानले.

फुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाने एकजुटीने दिलेले हे योगदान सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *