एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना*
![]()
*एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना*
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम जे कॉलेज ,जळगाव या ठिकाणी पालक शिक्षक संघ २०२५-२६ सह विचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने झाली. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन भारंबे , उपाध्यक्ष प्रा शितल काळे , सचिव प्रवीण महाजन,सहसचिव शितल महाजन आणि प्रा छाया चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा छाया चौधरी आणि डॉ श्रद्धा पाटील यांनी केलेत तर आभार प्रदर्शन प्रा गौरी अत्तरदे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सुवर्णमध्य साधणारा दुवा म्हणजे पालक शिक्षक संघ यशस्वीरित्या कार्य करणार असे आश्वासन दिले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे, आणि महाविद्यालयाचे समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. सदर सभेस महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि पालक सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ जयंत इंगळे, प्रा दारासिंग पावरा, प्रा छाया पाटील, प्रा वर्षा पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

