जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार!
![]()
जळगाव माध्यमिक पतपेढीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल ११ लाखांचा हातभार!
जळगाव प्रतिनिधी:
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी, जळगाव — या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी संस्थेच्या धर्मदाय निधीतून तब्बल ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अर्पण करण्यात आला.
हा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या मा. एस. डी. भिरुड यांच्या सेवा पूर्ती गौरव सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सोनम पाटील, मानद सचिव भगतसिंग पाटील, उपाध्यक्ष वैशाली महाजन, खजिनदार संजय निकम तसेच संचालक मंडळातील भावेश अहीरराव, जे. पी. सपकाळे, हेमंत चौधरी, तुषार बोरसे, सिध्देश्वर वाघुळदे, शैलेश राणे, आबा पाटील, डी. एस. पाटील, रविंद्र रणदिवे, अजय पाटील, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या धनादेशाचा अधिकृत सुपूर्दगी समारंभ आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला, ज्या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा धनादेश प्रत्यक्ष मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हाती सुपूर्द केला.
समाजकारणात संस्थेची सहभागाची भावना व सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन या कार्यातून घडले आहे.

