अमळनेर
माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन
![]()
‘माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीसाठी अमळनेरला बुधवारी भव्य महाशोभायात्रा अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे माझा संकल्प- भूमी सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा, यासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या […]
महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक ः भाविकांची अलोट गर्दी
![]()
महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात लघु रुद्राभिषेक ः भाविकांची अलोट गर्दी अमळनेर प्रतिनिधी : महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोरज मुहूर्तावर विश्व कल्याणासाठी लघू रुद्राभिषेक, शृंगार सेवा करण्यात आली. बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी सपत्निक वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक केला. श्री मंगळेश्वर महादेवांना सेवा अर्पण करण्यात आली. शुभम […]
सकल ज्ञान महोत्सव २०२६ : गुणवंतांचा गौरव, पत्रकार ईश्वर महाजन यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मान, शिवरात्रीच्या पावन पर्वावर जळगाव येथे अल्पबचत भवनात दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
![]()
सकल ज्ञान महोत्सव २०२६ : गुणवंतांचा गौरव, पत्रकार ईश्वर महाजन यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मान, शिवरात्रीच्या पावन पर्वावर जळगाव येथे अल्पबचत भवनात दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी — शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” अल्पबचत […]
रणाईचे माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसरात आदर, श्रद्धा आणि प्रेरणेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण […]
रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्कार प्रदान
![]()
रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्कार प्रदान अमळनेर : जळगाव येथे झालेल्या ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांना ‘ज्ञानवंत पत्रकार’ हा मानाचा पुरस्कार आज १५ रोजी मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडलेल्या या सोहळ्यात […]
छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमणार अमळनेर; शिवप्रेमी सज्ज भव्य सोहळ्यासाठी
![]()
अमळनेरमध्ये मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार अमळनेर प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या निमित्त नाट्यमंदिर परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात आले असून आकर्षक विद्युत […]
‘माझा संकल्प – भूमी सुपोषण’ : अमळनेरातून देशव्यापी जनजागरणाची भव्य सुरुवात
![]()
‘माझा संकल्प – भूमी सुपोषण’ : अमळनेरातून देशव्यापी जनजागरणाची भव्य सुरुवात अमळनेर प्रतिनिधी आपला परमपवित्र भारत देश कृषीप्रधान आहे. गेली कित्येक वर्षे आपण सुजलाम्- सुफलाम् स्थितीची अनुभूती घेतली आहे. मात्र, काही वर्षांपासून किंबहुना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या पूर्वजांनी पिढ्यान् पिढ्या सेंद्रीय व सकस शेती […]
व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला
![]()
व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला अमळनेर प्रतिनिधी — १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी अमळनेर शहरात देशप्रेमाचा जागर करत ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना आणि वीर नारी महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने […]
शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश
![]()
शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी विभागातील बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने […]
अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
![]()
अमळनेर शहरात पाणीपुरवठा नियोजनाला गती; ७–८ दिवसांवरून ४ दिवसांआड पुरवठा सुरू लवकरच ३ दिवसांआड पाणी देण्याचे लक्ष्य – नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियोजित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी व मा. श्री. रवींद्र चौधरी (रवी बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात […]

