_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_*
![]()
*_रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण_*
सलग दुसऱ्या वर्षी सातत्य राखत यावर्षी देखील प्रस्तुत शाळेचं स्नेहसंमेलन अतिशय हर्षोल्लासात ठरल्याप्रमाणे दि.11मार्च रोजी संध्याकाळी 6 ते 9 या नियोजित वेळेत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच ताईसो.रंजना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.उगमराव पाटील तसेच शिक्षणतज्ञ सदस्य श्री.संदिप पाटील,श्री.अधिकार पाटील व इतर शिक्षण प्रेमी यांच्या हस्ते सरस्वतीरुपी माॅं जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. मुख्याध्यापक श्री.योगराज पाटील यांनी प्रास्ताविक सादर करताना शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वर्षभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला.जेष्ठ शिक्षक श्री.मच्छिंद्र पाटील यांनी बहारदार चारोळ्या आणि शेरोशायरी च्या अनोख्या अंदाजाने सुत्रसंचलन करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर सामुहिक/एकल नृत्य,अंधश्रद्धा निर्मूलन गीतपर नाटीका तसेच विविध मनोरंजनात्मक/शैक्षणिक कार्यक्रम सादर करुन आपल्या पालकांना, ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.गावकऱ्यांनी खुल्या मनाने दाद देत भरगच्च रोख रकमेचा वर्षाव करत सुमारे अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले.स्टेज,मंडप,साऊंड सिस्टीम अगदी नाममात्र दरात उपलब्ध करून देणारे मंडप-डेकोरेटर्स चे संचालक श्री.बापू पाटील आणि श्री.सागर पाटील यांचा शाळेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच महीनाभरापासून विद्यार्थ्यांची तयारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सहशिक्षक डॉ.अनिल लोहार,श्रीम.नीळ मॅडम,श्री.मिलिंद तायडे,श्री.सचिन पाटील आणि श्री.हिरालाल पाटील यांनी मेहनत घेतली.
अखेरीस, शाळेत वर्षभरात राबविण्यात येणारे विविध प्रसंगोपात्त उपक्रमांची ग्रामस्थांनी दखल घेत तसेच शाळेप्रती सर्व स्टाफची तळमळ व समर्पण पाहून उपस्थित पालक,सुज्ञ नागरिकांच्या वतीने सर्व शिक्षकांचे कौतुकपर विशेष सत्कार करण्यात आला.

