अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन
![]()
अमळनेरमध्ये उदया ‘संत कबीर : जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान
महाराष्ट्र साहित्य परिषद व सानेगुरुजी ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम; प्रा. डॉ. मनोज महाजन यांचे मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अमळनेर व पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत साहित्याचा जागर” या उपक्रमांतर्गत “संत कबीर : जीवन व कार्य” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पूज्य सानेगुरुजी ग्रंथालयातील जुना टाऊन हॉल, अमळनेर (जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या व्याख्यानासाठी मु. जे. महाविद्यालय, जळगाव येथील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. मनोज महाजन हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर शाखेचे अध्यक्ष संदीप बाबुराव घोरपडे हे राहणार असून, पू. सानेगुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाशजी वाघ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. विजया गायकवाड करणार असून सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश माने (मराठी विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) करणार आहेत.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून दिलीप सोनवणे (अध्यक्ष, पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय) कार्यरत आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर शाखेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी नागरिक, साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास उपस्थित राहून संत साहित्याचा विचारसमृद्ध वारसा ऐकण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमासाठी भाऊसाहेब मल्हारराव देशमुख, दिनेश वसंतराव नाईक, उमेश प्रतापराव काटे, रमेश यशवंत पवार, सौ. विजया राजेंद्र गायकवाड तसेच कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
आपली उपस्थिती कार्यक्रमाला अधिक उजाळा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


