वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन
![]()
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदन
अमळनेर प्रतिनिधी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज प्रताप महाविद्यालयातील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे माननीय चेअरमन श्री. नीरज अग्रवाल, संचालक मा. योगेश मुंडळा व चिटणीस मा. प्रा. पराग पाटील यांना निवेदन देण्यात आले.
वस्तीगृहातील अपुरी मूलभूत सुविधा, स्वच्छतेचा अभाव, राहण्याची गैरसोय तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची बाब निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित समस्या तात्काळ मार्गी लावून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व राहणीमान सुधारण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील तसेच समस्या निकाली न लागल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी YIN अध्यक्ष कुशल घनश्याम पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील, करण साळुंखे, विवेक निकम, गौरव सोनटके, हर्ष पाटील, समाधान चव्हाण, विशाल पाटील, तुषार पाटील, गौरव चौधरी, समीर पाटील तसेच वस्तीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

