खानदेशी बोलींच्या साहित्यातून अभिजात मराठीला नवी उभारी” – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी
![]()
“खानदेशी बोलींच्या साहित्यातून अभिजात मराठीला नवी उभारी” – प्रा. डॉ. प्रभाकर जोशी
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 15 मार्च रोजी मानवधन विद्यानगरी नासिक येथे सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या 23व्या राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते .या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी सर होते
त्यांनी आपल्या भाषणातून साहित्य सरिता समृद्ध करणारी जिवंत झरे म्हणजे साहित्य संमेलन अशा प्रकारे विचारांची मांडणी करीत बोलीभाषेतील साहित्यातूनच अभिजात मराठीची समृद्धी होत असल्याची विचारधारा आपल्या व्यक्त केली. खानदेशात येणाऱ्या जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी आपल्या अहिराणी आदिवासी. तावडी .लेवा पाटीदार .पावरा. बागलाणी. गुजर वारली
अशा विविध बोलीतून आपले भावनिक चिंतन साहित्याच्या कथा कादंबरी कविता या माध्यमातून आविष्कृत करीत आहे . अहिराणी बोलीभाषेची साहित्यसंमेलने भगवान पाटील आयोजित करीत आहेत. अशोक कोळी तावडी बोलीला प्रोत्साहन देत आहे .
अशोक कोतवाल कृष्णा पाटील ,डॉ रमेश सुर्यवंशी,बाळासाहेब गुंजाळ डॉ. संजीव गिरासे डॉक्टर म सु. पगारे गोकुळ बागुल वा.ना. आंधळे बी एन पाटील शशिकांत हिंगोणेकर इत्यादी लेखकांच्या माध्यमातून बोलीभाषेतील साहित्य समृद्ध होत आहे. अभिजात मराठी भाषेला प्रेरणा देणारीच ही घटना आहे . असे विचार अध्यक्षांनी भाषणातून मांडलेत.
संमेलनाचे उद्घाटन कवी राजा ठाकूर यांनी केले स्वागताध्यक्ष श्री सावळाराम तिदमे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
आयोजक सतिश जैन आणि कार्यकारी मंडळ यांनी संमेलनाचे नियोजन केले संमेलनात परिसंवाद कवी संमेलन कथाकथन व पुरस्कार वितरण इत्यादी कार्यक्रम संपन्न झालेत. संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले संमेलनाला नाशिककर साहित्यिक व रसिक श्रोत्यांची चांगली उपस्थिती होती..

