Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र

प्रताप मिलच्या ‘राजा’चा जल्लोष! विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा दिमाखात सन्मान , गणेशोत्सव २०२६ निमित्त रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

ईश्वर रामदास महाजन 21 Sep 2026, 02:55 553 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 4 min read
🔧 साधने:
प्रताप मिलच्या ‘राजा’चा जल्लोष! विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा दिमाखात सन्मान   , गणेशोत्सव २०२६ निमित्त रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी: प्रताप मिल परिसरातील ‘प्रताप मिलचा राजा’ गणेशोत्सव २०२६ निमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रताप मिलचा राजा, अमळनेर आणि दैनिक बातमीदार यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या विजेत्यांचा प्रमुख पाहुणे श्री. नीरजभाऊ अग्रवाल, सुप्रसिद्ध उद्योजक तथा मा. खा. शी. मंडळ कार्याध्यक्ष यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या उत्साहाला विविध स्पर्धांची रंगत लाभल्याने प्रताप मिल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. लिंबू-चमचा, मटकी फोड, डान्स, संगीत खुर्ची, क्रिकेट बॉल, चित्रकला यांसह विविध स्पर्धांमध्ये बालकांपासून तरुणांपर्यंत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले कलागुण व कौशल्य सादर केले.

विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या प्रसंगी दैनिक बातमीदारचे कार्यकारी संपादक श्री. अरविंद बाबिस्कर, अमळनेर ब्युरो चीफ श्री. बापूराव पाटील (ठाकरे), मुख्य संपादक श्री. हेमंत पाटील यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कलागुणांना व्यासपीठ, उत्साहाला मिळाली दाद!

स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त कला-कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि गणेशोत्सवाचा आनंद सर्वांना एकत्रितपणे घेता यावा, या उद्देशाने अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. नीरजभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव झाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

प्रताप मिल कंपाऊंड परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. त्यामुळे संपूर्ण परिसरात गणेशभक्ती, मनोरंजन आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीधनगर समाज कर्मचारी संघटनेची भुसावळ-यावल संयुक्त बैठक उत्साहात , विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह गुणवंतांचा सत्कार; जळगाव जिल्ह्यात कर्मचारी गणनेला सुरुवात पुढील बातमी →आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!