Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरीविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी
खान्देश विशेष बातमी

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा

ईश्वर रामदास महाजन 27 Oct 2026, 10:41 997 views अपडेटेड 28 Oct 2026, 01:09 4 min read
🔧 साधने:
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न,     आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा

अमळनेर: प्रतिनिधी-शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन तसेच संचालक योगेश मुंदडे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि क्रीडा सुविधांच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच आजपर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत, उपलब्ध क्रीडा साहित्य, सुविधांची सद्यस्थिती आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी यांवरही सखोल विचारविनिमय करण्यात आला.

ध्येय एकच - अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची

अमळनेर तालुका क्रीडा संकुल हे केवळ क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणारे केंद्र न राहता, उद्याच्या सक्षम खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे, त्यांच्या गुणवत्तेला वाव देणारे आणि जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवणारे केंद्र बनावे, हीच या प्रयत्नांमागील खरी भावना आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका क्रीडा संकुल हे दर्जेदार, आधुनिक, अभिनव आणि जिल्ह्यातील एक आदर्श क्रीडा संकुल म्हणून नावारूपास यावे, यासाठी सर्व संबंधितांनी एकजुटीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

या अनुषंगाने आमदारांनी उपस्थित अधिकारीवर्गासोबत विविध विषयांवर चर्चा करून क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करून भविष्यातील गरजांनुसार अधिक सक्षम व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सारे कटिबद्ध

सक्षम क्रीडा सुविधा म्हणजे सक्षम खेळाडू आणि सक्षम खेळाडू म्हणजे उज्ज्वल भविष्य या ध्येयाने अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीरत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..! पुढील बातमी →विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!