विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजन

आडगाव ता एरंडोल : - आडगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जानफळ येथे गट शिक्षणाधिकारी आर डी महाजन यांचे अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पाडली . प्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शालेय पोषण आहार अधिक्षक जे डी पाटील , एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर , केंद्र प्रमुख नितीन पाटील , नवनिर्वाचित केंद्रप्रमुख सचिन हळीगें , प्रमोद काकूळीद , विनोद सपकाळे , जानफळ शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील , केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते . प्रास्ताविक पर भाषणात अशोक पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची समस्या , शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना खूप कसरत करावी लागते . जानफळ गाव शैक्षणिक बाबतीत खूप मागासलेले असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वच प्रयत्नशील आहोत . प्रमुख अतिथी जे डी पाटील यांनी पोषण आहार संदर्भातील विविध सुचना दिल्या शैक्षणिक गुणवता टिकावण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेऊन विदयार्थ्यांचा बौध्दीक विकास कसा होईल याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे . विनोद सपकाळे यांनी मुल्यवर्धित शिक्षणाची विदयार्थांना शिक्षण देणे काळाची गरज आहे .केंद्रप्रमुख नितीन पाटील यांनी शिक्षण परिषदेचे नियोजनाप्रमाणे निपुण महाराष्ट्र अभियान , पाठाचे नियोजन , मुल्यवर्धन उजळणी प्रशिक्षण , राज्याचे धोरणात्मक स्थानिक विषय याबाबतीत माहिती दिली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राकेश पाटील यांनी केले . शेवटी आभार मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी मानले .परिषदेला मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते ..
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News
9860352960

संबंधित बातम्या
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...
अमळनेरमध्ये मतचोरीच्या आरोपांविरोधात तीव्र निषेध; मुख्य निवड...