Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र

धनगर समाज कर्मचारी संघटनेची भुसावळ-यावल संयुक्त बैठक उत्साहात , विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह गुणवंतांचा सत्कार; जळगाव जिल्ह्यात कर्मचारी गणनेला सुरुवात

ईश्वर रामदास महाजन 20 Sep 2026, 16:09 842 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 7 min read
🔧 साधने:
धनगर समाज कर्मचारी संघटनेची भुसावळ-यावल संयुक्त बैठक उत्साहात ,   विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह गुणवंतांचा सत्कार; जळगाव जिल्ह्यात कर्मचारी गणनेला सुरुवात

भुसावळ प्रतिनिधी : धनगर समाज कर्मचारी संघटना, भुसावळ व यावल तालुक्याची संयुक्त बैठक जगन्नाथ उर्फ बंडू शेठ हडपे यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ येथे उत्साहात पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली.

या बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक पी. एस. सोनवणे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, मल्हार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण ठाकरे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, महानगराध्यक्ष यशवंत शिरोळे, महिला अध्यक्ष श्रीमती भारती ठाकरे तसेच जिल्हा पदाधिकारी टी. बी. पांढरे, पांडुरंग पवार, गजानन देशमुख, संतोष कचरे आदी उपस्थित होते.

बैठकीत संघटनेच्या विस्तारासाठी विविध जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. जिल्हा संघटकपदी दीपक देशमुख, जिल्हा चिटणीसपदी गणेश बादशहा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय पाचपोळे, जिल्हा महिला चिटणीसपदी प्रमिला ढालपे यांची निवड करण्यात आली. तसेच भुसावळ तालुका महिला अध्यक्षपदी मीनाक्षी दिगंबर सोनवणे यांची निवड झाली.

तालुका पदाधिकाऱ्यांमध्ये यावल तालुकाध्यक्षपदी सचिन ढालपे, भुसावळ तालुकाध्यक्षपदी पद्माकर सावळे, भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी भूषण ठोके, भुसावळ तालुका कार्याध्यक्षपदी प्रवीण गांधीले, यावल तालुका उपाध्यक्षपदी विजय वसंत धनके, भुसावळ तालुका सचिवपदी ज्ञानेश्वर रामदास सोनवणे, यावल तालुका सचिवपदी उमेश कडू लासुरे, भुसावळ तालुका सहसचिवपदी कैलास धनगर, भुसावळ तालुका संघटकपदी देवेंद्र बोरसे, यावल तालुका संघटकपदी अमोल सावळे, भुसावळ तालुका कोषाध्यक्षपदी संदीप निळे आणि प्रसिद्धी प्रमुखपदी जितेंद्र शिरोळे यांची निवड करण्यात आली.

गुणवंतांचा सत्कार

बैठकीदरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. आर. धनगर सर, मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल व्ही. पी. सुलताने तसेच उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद उर्फ बाबू शेठ हडपे यांचा सत्कार करण्यात आला.

याशिवाय ओम सचिन ढालपे यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल, रोहन संजय पाचपुडे यांची एमडीसाठी निवड झाल्याबद्दल आणि ऋतुचित पद्माकर सावळे यांनी तृतीय वर्ष उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात धनगर समाज कर्मचारी गणनेला सुरुवात

कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या आगामी काळातील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली. धनगर समाजातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना संघटित करून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी येणाऱ्या महिनाभरात धनगर समाज कर्मचारी गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी गणनेला धनगर समाज कर्मचारी संघटनेकडून २० सप्टेंबर २०२६ पासून अधिकृतपणे सुरुवात झाल्याची घोषणा तुळशीराम सोनवणे यांनी केली.

ही कर्मचारी गणना २० सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण तसेच इतर विभागांमध्ये कार्यरत धनगर समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गणनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला जिल्हाभरातून कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा तुळशीराम सोनवणे यांनी व्यक्त केली.

यावेळी गणेश बागुल, नामदेव सावळे, अनिल जटाळे आणि पी. एस. सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस मल्हार सेनेचे माजी तालुकाध्यक्ष मधुकर दशरथ धनगर (कडगाव), दिगंबर दत्तू सोनवणे, अजय धनसिंग भालेराव, धनश्री गणेश बादशहा, राजेश नारायण सावळे, विशाल प्रल्हाद ठोके, डॉ. कैलास ठाकरे, राजेश झटकार, राजेंद्र चुलावंत सावळे, मनोहर जगन्नाथ काटे, जयवंत देविदास ठोके, प्रा. डॉ. अनिल रघुनाथ सावळे यांच्यासह यावल व भुसावळ तालुक्यातील धनगर समाजातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढालपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक देशमुख यांनी केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीशेतकरी कुटुंबातील निरंजनची CBIमध्ये भरारी! , साने गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत ‘CBI सब-इन्स्पेक्टर’पदी अभिमानास्पद निवड पुढील बातमी →प्रताप मिलच्या ‘राजा’चा जल्लोष! विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा दिमाखात सन्मान , गणेशोत्सव २०२६ निमित्त रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!