Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
खान्देश विशेष बातमी

अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

ईश्वर रामदास महाजन 28 Oct 2026, 10:32 1K views अपडेटेड 29 Oct 2026, 04:49 5 min read
🔧 साधने:
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती    , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक श्री. मनोज भाऊराव पाटील यांची नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या पत्रान्वये त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनोज पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करताना तसेच बांधकाम समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना शहरातील नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन जनसेवेचे कार्य केले. साने गुरुजी आणि संत सखाराम महाराज यांच्या पवित्र भूमीत त्यांनी आपल्या कार्यातून नागरिकांशी जवळीक निर्माण केली. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य, कर्तव्यदक्षता आणि कामातील नीटनेटकेपणा ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात.

काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्क यांची दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ राजकीय वारशाची परंपरा

मनोज पाटील हे अमळनेरचे माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांचे सुपुत्र आहेत. वडिलांकडून लाभलेला सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी स्थानिक राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागातील पक्ष संघटनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

मनोज पाटील यांच्या नियुक्तीबद्दल अमळनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भागवत सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, राजेंद्र चौधरी सर, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, शरद पाटील, कैलास पाटील, प्रवीण जैन, सईद तेली, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पी. वाय. पाटील, शिंदे, दिलीप पाटील, राकेश पवार, तौसीब तेली तसेच विविध काँग्रेस पदाधिकारी आणि काँग्रेसप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आगामी संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमळनेरमधून नाशिकच्या संघटनात्मक जबाबदारीपर्यंत झालेली ही वाटचाल मनोज पाटील यांच्या राजकीय कार्याची दखल मानली जात असून, त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.**

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासा पुढील बातमी →डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!