Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबातील निरंजनची CBIमध्ये भरारी! , साने गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत ‘CBI सब-इन्स्पेक्टर’पदी अभिमानास्पद निवड

ईश्वर रामदास महाजन 20 Sep 2026, 15:56 1.1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 4 min read
🔧 साधने:
शेतकरी कुटुंबातील निरंजनची CBIमध्ये भरारी!  ,  साने गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत ‘CBI सब-इन्स्पेक्टर’पदी अभिमानास्पद निवड

अमळनेर प्रतिनिधी :

निंभोरा, ता. अमळनेर येथील शेतकरी कुटुंबातील चि. निरंजन सुनील पाटील याने आपल्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये सब-इन्स्पेक्टर (Sub-Inspector) पदावर अभिमानास्पद निवड मिळवली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाने निंभोरा परिसरासह साने गुरुजी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संयम, जिद्द आणि मेहनतीचे यशस्वी फलित!

अतिशय संयमी स्वभाव, अभ्यासू वृत्ती, प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली जिद्द व चिकाटी यामुळे निरंजनने हे यश संपादन केले. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केंद्रीय तपास यंत्रणेत महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

निरंजनच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबीयांचे पाठबळ तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येय गाठता येते, हे त्याने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

‘साने गुरुजी’ परिवाराकडून कौतुकाची थाप

निरंजन हा साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याची CBIमध्ये सब-इन्स्पेक्टरपदी झालेली निवड ही विद्यालयासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल निरंजन व त्याच्या पालकांचे संपूर्ण साने गुरुजी परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख सर तसेच श्री. जे. एस. पाटील सर यांनी निरंजनचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप

“परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी अभ्यास, मेहनत, जिद्द आणि सातत्याची साथ असेल तर यशाचे शिखर गाठता येते,” हा संदेश निरंजनच्या यशातून अधोरेखित झाला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या निरंजनने मिळवलेले हे यश परिसरातील तसेच साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारे ठरले आहे.

चि. निरंजन सुनील पाटील व त्यांच्या पालकांचे साने गुरुजी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीशब्दांना चिंतनाची धार, वक्तृत्वाला सादरीकरणाची साथ! , “चिंतन, उच्चारण अन् सादरीकरण; वक्तृत्व यशाचे त्रिसूत्र!” — प्रा. वा. ना. आंधळे पुढील बातमी →धनगर समाज कर्मचारी संघटनेची भुसावळ-यावल संयुक्त बैठक उत्साहात , विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह गुणवंतांचा सत्कार; जळगाव जिल्ह्यात कर्मचारी गणनेला सुरुवात

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!