Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील , बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

ईश्वर रामदास महाजन 12 Oct 2026, 10:49 1.1K views अपडेटेड 28 Oct 2026, 20:15 6 min read
🔧 साधने:
सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील ,   बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

अमळनेर: प्रतिनिधी-सुरवातीला एस टी डेपोतील वर्कशॉप व इतर विकासकामांसाठी आठ कोटी निधी मिळाल्याने ती कामे जवळपास पूर्णत्वास आली आहे,आता पुन्हा अडीच कोटी निधीतून संपूर्ण आगारत पेव्हर ब्लॉक आणि रंगरंगोटीची कामे होणार असल्याने येत्या

सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेला दिसेल अशी भावना माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.

आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते अमळनेर बसस्थानकातील विविध विकासकामांच्या द्वितीय टप्प्याचा भव्य भूमिपूजन सोहळा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांना नवी दिशा देणाऱ्या या कार्यक्रमात असंख्य मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.अमळनेर मतदारसंघात दुष्काळ असल्याने आमदार पाटील यांनी सत्कार स्वीकारणे टाळून शेतकरी बांधवाप्रती सदभावना व्यक्त केली.पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामिण जनतेसाठी एस टी चे महत्व किती याची कल्पना मला आहे कारण माझी स्वतःची आई दररोज याच एस टी ने आपल्या गावी शेतात जात असते.याआधी बस डेपोची बरीच दुरावस्था असताना राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आठ कोटी निधी मिळविला.त्यातून पार्किंग परिसर दुरुस्ती वर्कशॉप नूतनीकरण, मॅनेजर ऑफिस,मॅनेजर निवासस्थान नूतनीकरण आदी कामे मार्गी लागून जवळपास पूर्णत्वासही आलीत.त्यानंतर बस आगाराकडे लक्ष वेधून याठिकाणी संपुर्ण परिसरात काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक व रंगरंगोटी साठी अडीच कोटी निधी मिळविला त्याचेही प्रत्यक्ष काम आज सुरू झाले आहे.

याशिवाय अमळनेर बस आगारात 100 बसेस ची आवश्यकता असताना केवळ 90 बसेस उपलब्ध होत्या त्यातील बहुतांश दुरावस्था झालेल्या होत्या.त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून 20 ते 22 नवीन बसेस उपलब्ध झाल्या असून अजून किमान 50 नवीन बसेस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यासोबतच बस स्थानकावरून अगदी हाकेच्या अंतरावर नवीन प्रशासकीय इमारत व पंचायत समिती इमारतीचे काम पूर्णत्वास येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बस ने आल्यानंतर पायीच सर्व शासकीय कार्यालयात जाऊन तेथील काम आटोपून सोबतच बाजारही जवळ असल्याने तेथून खरेदी करून बसने लवकर घरी पोहोचू शकेल हेच माझ्यासाठी समाधान असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी मंचावर माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,मार्केट सभापती अशोक पाटील,मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत,सौ रिता बाविस्कर,कामगार नेते एल टी पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,भाजपचे ऍड व्ही आर पाटील, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, शहराध्यक्ष योगेश महाजन,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील,माजी शहर प्रमुख संजय पाटील,आगार व्यवस्थापक राकेश शिवदे,वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने,वरिष्ठ लिपिक तुषार साळुंखे, अमोल पाटील यासह राष्ट्रवादी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,आजी माजी नगरसेवक,शेतकी संघ व मार्केटचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच सर्व रापम कर्मचारी व युनियन पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी केले.

विद्यार्थ्यांना दिला भूमीपूजनाचा मान

यावेळी बस स्थानकात मोठ्या संख्येने ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित असल्याने आमदारांनी त्यांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते भूमीपूजनाचे नारळ वाढविण्यात येऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीराणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी ,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) उपक्रम; ९० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत उपचार पुढील बातमी →धनदाई महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान*

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!