धनदाई महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान*

*धनदाई महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियान*
अमळनेर प्रतिनिधी: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अमळनेरचे प्रांताधिकारी श्री. मयूर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अमळनेर निवडणूक शाखेच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या नमुना क्रमांक ६ (फॉर्म क्र. ६) चे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना हा अर्ज भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. या उपक्रमांतर्गत सुमारे ५० विद्यार्थ्यांना अर्जांचे वाटप करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला (एलसी), तसेच नियमानुसार आवश्यक असलेल्या आई किंवा वडिलांच्या मतदान कार्डाच्या छायांकित प्रतींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक शाखेचे प्रतिनिधी श्री. श्याम शिंपी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, ग्रंथपाल प्रा. डॉ. प्रवीण पवार आणि निवडणूक शाखेचे प्रतिनिधी श्री. श्याम शिंपी उपस्थित होते. लोकशाही व्यवस्थेत मतदानाला महत्त्वाचे स्थान असून, युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...