राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी ,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) उपक्रम; ९० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत उपचार

पारोळा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आरोग्यविषयक समस्या वेळेत निदर्शनास याव्यात आणि विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथे इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेशन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ५७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९० विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत.
या आरोग्य तपासणी उपक्रमात डॉ. पंकज नेरकर, डॉ. सायली पाटील आणि आरोग्य सेविका सुनिता मोरे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या ओळखणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सल्ला देणे आणि गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था करणे यावर भर देण्यात आला. यात पुढील समस्यांबाबत उपचार समुपदेशन केले. चालताना, पळताना किंवा जिना चढताना/उतरताना दम लागणे, शरीरावर चट्टे, पांढरे डाग किंवा गाठी असणे, झटके / मिरगीचा त्रास असणे, दूरचे किंवा जवळचे दिसण्यास त्रास होणे किंवा दृष्टीशी संबंधित इतर समस्या असणे, दातांविषयी समस्या असणे – दात दुखणे, दात किडणे, हिरड्यांचा त्रास इत्यादी, रक्ताच्या तपासण्या, CT Scan, MRI, X-Ray, ECG किंवा इतर विशेष तपासण्या करण्यास सांगितलेले असणे, लघवीच्या जागेशी संबंधित त्रास – त्वचा मागे न सरकणे, Hernia, Undescended Testis, लघवी करताना जळजळ होणे इत्यादी, घशातील Tonsils चा त्रास असून ऑपरेशन सांगितलेले असणे, Appendix चा त्रास असून ऑपरेशन सांगितलेले असणे, सतत आजारी पडणे किंवा सध्या कोणतेही औषधोपचार/उपचार सुरू असणे, किशोरवयीन मुला-मुलींशी संबंधित कोणत्याही आरोग्यविषयक समस्या असणे, याव्यतिरिक्त इतर कोणताही आरोग्यविषयक त्रास असणे.
किशोरवय हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याने नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य समुपदेशनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. संतुलित व पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, अभ्यासाचा ताण, भावनिक स्वास्थ्य आणि आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. आरोग्याच्या तक्रारी वेळेत ओळखून आवश्यक वैद्यकीय सल्ला घेतल्यास संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक तथा उपनगराध्यक्ष रोहन मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील आणि समन्वयक डॉ. ईश्वर एस. पाटील यांनी उपक्रमाच्या नियोजनात व अंमलबजावणीत सहकार्य केले. तसेच प्रा. पी. पी. पाटील, प्रा. ए. ए. मोरे प्रा. सौ. एम. आर. नेरकर, प्रा. सौ. एस. आर. पाटील, प्रा. पी. एस. कोळी, प्रा. एन. एन. पवार, प्रा. श्रीमती वाय. आर. पाटील, प्रा. श्री. एस. एस. सूर्यवंशी, प्रा. श्री. एल. आर. देसले, प्रा. श्रीमती एस. डी. भोई यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या ओळखण्यास मदत झाली असून, त्यापैकी ९० विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळणार असल्याने त्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असून, आरोग्य तपासणी व समुपदेशनाच्या माध्यमातून निरोगी आणि सक्षम पिढी घडविण्याचा सकारात्मक प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...