Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळतोय ! प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन पाहुन आमदार अनिल पाटील यांनी केला खा. स्मिताताई वाघ यांचा गौरव !

ईश्वर रामदास महाजन 09 Oct 2026, 10:27 1.7K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 7 min read
🔧 साधने:
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळतोय !    प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन पाहुन आमदार अनिल पाटील यांनी केला खा. स्मिताताई वाघ यांचा गौरव !

अमळनेर, प्रतिनिधी

आपल्या तालुक्याचा खासदार असल्यावर काय फायदा होतो हे अमळनेरवासियाना या केंद्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने स्मिताताई वाघ यांनी दाखवून दिले आहे. या प्रदर्शनात कृषी, हस्तकला, नाबार्ड, आटोनॉमिक एनर्जी, डिफेन्स, आई आई टी असे सगळे विभाग सहभागी झाले होते. आपली मुले नेव्ही, एयरफोर्समध्ये कसे जाता येईल याची माहिती या ठिकाणी मिळाली, हे पाहुन आमच्या गावचे नागरिक आनंदि झाले, असे गौरवोद्गार आमदार अनिल दादा पाटिल यांनी काढले.

खा. स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने अमळनेर येथील कलागुरु मंगल कार्यालयात शुक्रवारी आयोजित तीन दिवशीय प्रगतिशील महाराष्ट्र 2026 या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खा. स्मिताताई वाघ, पारोळा - एरंडोलचे आमदार अमोल दादा पाटील, भाजपच्या प्रदेश सचिव भैरवीताई वाघ-पलांडे, माजी सभापती दिनकर पाटिल, डॉ. अनिल शिंदे, डि. जी. पाटील, एरंडोलचे नगरध्यक्ष नरेंद्र ठाकुर, चेतन राजपूत, लालचंद सैनानी, सुरेश पाटील, के. बी . साळुखे, कपिल पाटील, नितिन पाटिल, संजू तात्या पाटील, अमोल चव्हाण, भारती सोनवणे, जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, कलागुरु ग्रूपचे पंकज गोकलाणी आदिंची उपस्थिती होती.

या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रगतिशील महाराष्ट्र 2026 प्रदर्शनाचा पारितोषिके वितरणाने समारोप करण्यात आला. या प्रदर्शनाला तीन दिवसात साडे बारा हजराहूंन अधिक, विद्यार्थी, शिक्षक, सरकारी अधिकारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी भेट दिली.

यावेळी बोलताना आयोजिका खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, अमळनेर सारख्या शहरात केंद्र व राज्य शासनाच्या योजना आणि उपक्रमांचे प्रदर्शन भरविने हे थोडेसे अवघड होते. कारण तालुक्याच्या ठिकाणी केंद्रीय पातळीवरचे वरिष्ठ अधिकारी यायला फ़ारसे उस्तुक नसतात. पण माझ्या तालुक्यातील लोकांना केंद्र पातळीवरचे लोक आले पाहिजेत म्हणून चार महिन्या पासून मी प्रयत्न करीत होते. आज मला सांगायला आनंद वाटतो की तीन दिवसात या प्रदर्शनाला बारा ते तेरा हजार लोकांनी भेट दिली.

आपले मनोगत व्यक्त करताना पारोळा आमदार अमोल दादा पाटील म्हणाले की रस्ता, गटर आणि लाईट सोडून सरकार काय काय उपक्रम राबविते, हे पाहुन थक्क करायला लावणारे प्रदर्शन स्मिताताईंनी भरविले होते.

प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रस्ताविक केले. संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अखिला श्रीवासन यांनी आभार मानले.

निवडक सरकारी विभागांना उत्कृष्ठ सादरीकरणासाठी पारितोषिके देऊन केले सन्मानित !

या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ठ सादरिकरनासाठी विविध सरकारी विभागाना सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराने गौरविन्यात आले. यामध्ये बेस्ट स्टॉल : यंत्र इंडिया लिमिटेड, रक्षा उत्पादन एवं आत्मनिर्भरता के लिए म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड. इनोवेशन हब बेस्ट स्टॉल : भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई, वित्तीय साक्षरता बेस्ट स्टॉल: भारतीय रिज़र्व बैंक, संचार एवं नवाचार बेस्ट स्टॉल : महाजेनको. ऊर्जा क्षेत्र में रचनात्मक सादरिकरण बेस्ट स्टॉल: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), परमाणु ऊर्जा के प्रचार-प्रसार बेस्ट स्टॉल: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), गुणवत्ता व ज्ञान प्रसार बेस्ट स्टॉल: भारतीय मानक ब्यूरो (BIS), डिजिटल गवर्नेंस बेस्ट स्टॉल: राष्ट्रीय ई-गवर्नेंस प्रभाग (NeGD) व इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MeitY), डिजिटल समावेशन वं भाषा प्रौद्योगिकी बेस्ट स्टॉल: डिजिटल इंडिया–भाषिणी प्रभाग. संवादात्मक सादरिकरण: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO), पारंपरिक चिकित्सा के प्रचार-प्रसार बेस्ट स्टॉल: केंद्रीय सिद्ध अनुसंधान परिषद (CCRS) व आयुष मंत्रालय. वैज्ञानिक नवाचार बेस्ट स्टॉल: वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR). लोक संवाद बेस्ट स्टॉल मध्ये भारतीय स्टेट बैंक (SBI), भारतीय चाय बोर्ड (Tea Board of India) तथा भारतीय रेलवे खानपान एवं पर्यटन निगम लिमिटेड (IRCTC) यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविन्यात आले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीदतकला’मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आरटीओकडून कारवाईचा बडगा, पालकांमध्ये प्रचंड खळबळ दतकलाच्या अनेक बसवर गंभीर कारवाई, पुढील बातमी →शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश; आमदार किशोर दराडे व सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!