Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश; आमदार किशोर दराडे व सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

ईश्वर रामदास महाजन 09 Oct 2026, 14:13 1.6K views अपडेटेड 26 Oct 2026, 11:54 6 min read
🔧 साधने:
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी    माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश; आमदार किशोर दराडे व सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव, दि. ९ ऑक्टोबर : शालार्थ प्रणालीतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित राहणाऱ्या वेतन देयकांच्या प्रश्नावर माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. शालेय शिक्षण विभागाने ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंतची आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या अटीवर संबंधित वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेतन देयके सादर करण्यातील अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, उच्च माध्यमिक संघटनेचे सुनील गरुड, माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे संदीप डोलारे, समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, संतोष कचरे, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, कार्याध्यक्ष पी.ए. पाटील, सुनील वानखेडे, सुरेश अहिरे, यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. तसेच शिक्षक आमदार किशोर दराडे आणि पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रकरणी पाठपुरावा केल्याने संबंधित प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.

शालेय शिक्षण विभागाच्या ९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, शालार्थ प्रणालीतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मंजूर पदांपेक्षा अधिक पदे, तसेच डिजिटलायझेशन, जन्मदिनांक, रुजू दिनांक, शालार्थ क्रमांक आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे वेतन देयके सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

१ नोव्हेंबर २०२६ पासून संचमान्यतेतील मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवरील कर्मचाऱ्यांची वेतन देयके कोणत्याही परिस्थितीत अदा करता येणार नाहीत, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळा व शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीतील त्रुटींची पूर्तता निर्धारित मुदतीत करणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे वेतन देयके सादर करण्यास अडथळे येत असलेल्या शाळांना दिलासा मिळणार आहे. मात्र, वेतन देयकांची प्रत्यक्ष मंजुरी व वेतन जमा होण्यासाठी संबंधित त्रुटींची पूर्तता आणि प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होणे आवश्यक राहणार आहे.

या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पाठपुरावा करणाऱ्या दोन्ही आमदारांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित प्रलंबित प्रश्नही तातडीने मार्गी लावावेत, अशी अपेक्षा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

— माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा

“शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने वेतन देयके सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शाळांनी वेतन देयके तात्काळ फॉरवर्ड करावीत. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक तसेच वेतन पथकाने नवरात्रोत्सव व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या लॉटच्या वेतन देयकांवर तातडीने कार्यवाही करून वेतन अदा करावे.”

— तुळशीराम सोनवणे

माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळतोय ! प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन पाहुन आमदार अनिल पाटील यांनी केला खा. स्मिताताई वाघ यांचा गौरव ! पुढील बातमी →🔴 बालविवाहाला पूर्णविराम! प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शनातून ‘बालविवाहमुक्त भारत’चा जागर

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!