Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र विशेष बातमी

दतकला’मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आरटीओकडून कारवाईचा बडगा, पालकांमध्ये प्रचंड खळबळ दतकलाच्या अनेक बसवर गंभीर कारवाई,

ईश्वर रामदास महाजन 09 Oct 2026, 09:35 1.2K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:47 6 min read
🔧 साधने:
दतकला’मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ   आरटीओकडून कारवाईचा बडगा, पालकांमध्ये प्रचंड खळबळ   दतकलाच्या अनेक बसवर गंभीर कारवाई,

‘सोलापूर प्रतिनिधी

: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्यावर, त्यांच्याच निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असेल, तर यापेक्षा गंभीर बाब कोणती? शिक्षणाच्या मंदिरात भविष्य घडवण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या प्रवासाची साधी सुरक्षितताही जपली जात नसेल, तर संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे. सोलापूर जिल्ह्यातील केतूर येथील दतकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीत कागदपत्रांची मुदत संपल्याचे समोर आले असून, अनेक बसवर आरटीओने कारवाई केली आहे. नियम धाब्यावर, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आणि पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही बाब शिक्षणसंस्थांच्या जबाबदारीवरच गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दतकला महाविद्यालयाला अचानक भेट देऊन बसची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक स्कूल बसच्या कागदपत्रांची मुदत संपलेली असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, कागदपत्रांची मुदत संपलेली असतानाही विद्यार्थ्यांना असुरक्षितरीत्या घेऊन प्रवास करणाऱ्या अनेक बस प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या मार्गावर धावताना आढळून आल्या.

या बस ‘दतकला विद्यालय, इंदापूर’ येथे चालवल्या जात असल्याची माहिती प्राचार्यांनी अधिकाऱ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थेवर आता वाहतूक विभाग आणखी कडक कारवाई करणार का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

भोंदूबाबा मनोहर भोसले यांच्या प्रकरणात दतकला शिक्षण संस्थेच्या प्रमुखांचा समावेश असल्याची बाब समोर आल्यानंतर दतकल शिक्षण संस्थेवर आता वेगवेगळ्या विभागांकडून कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता आरटीओने गाड्यांवर कारवाई केली आहे.

संदीप म्हेत्रे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकलूज यांनी सांगितले की,कारवाईनंतर आमच्या पथकाने दतकला महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मार्कंड यांची भेट घेऊन सुरक्षेसंदर्भात माहिती दिली आहे. स्कूल बसची सर्व आवश्यक कागदपत्रे व पासिंग तात्काळ अद्ययावत करूनच मुलांची सुरक्षित वाहतूक करावी, अन्यथा बस रस्त्यावर धावू दिल्या जाणार नाहीत,असे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा जीव हा कोणत्याही संस्थेच्या प्रतिष्ठेपेक्षा, व्यवस्थापनाच्या सोयीपेक्षा आणि आर्थिक गणितापेक्षा कितीतरी मोलाचा आहे. स्कूल बसची कागदपत्रे, परवाने आणि आवश्यक तांत्रिक तपासण्या या केवळ सरकारी नियमांची पूर्तता करणाऱ्या बाबी नाहीत, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची हमी आहेत. तीन बसवर कारवाई झाली म्हणजे प्रश्न संपला, असे समजून चालणार नाही. संबंधित सर्व वाहनांची सखोल तपासणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, याची ठोस व्यवस्था करणे आवश्यक आहे. आरटीओचा कारवाईचा बडगा केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित राहणार की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी निश्चित होणार? हा खरा प्रश्न आहे. कारण, निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्यानंतर कारवाई करून काहीच उपयोग नसतो. अपघात होण्याआधी जागे होणे, हीच प्रशासनाची आणि शिक्षणसंस्थांची खरी कसोटी आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअजितदादांचे विश्वासू सहकारी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा निर्धार: 'पीपल एज्युकेशन सोसायटी'चा कायापालट आणि विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण हेच ध्येय. ​५०० कोटींच्या मंजूर निधीच्या प्रत्यक्ष वितरणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार. ​आपसातील व पुढील बातमी →अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळतोय ! प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन पाहुन आमदार अनिल पाटील यांनी केला खा. स्मिताताई वाघ यांचा गौरव !

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!