संत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईचा गोड सवाल; चिमुकल्यांनी सांगितले आवडीचे फळ!*

मेहरूण प्रतिनिधी
पारंपरिक लोकसंस्कृतीची ओळख करून देतानाच पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे भुलाबाई उत्सवानिमित्त पूर्व प्राथमिक वर्गातील चिमुकल्यांसाठी ‘भुलाबाई सांगते – माझे आवडते फळ कोणते?’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला.
भुलाबाईसमोर विविध फळांची चित्रे व प्रतिकृती ठेवण्यात आल्या. यावेळी शिक्षकांनी भुलाबाईच्या माध्यमातून चिमुकल्यांना, ‘माझे आवडते फळ कोणते असेल?’, ‘हे कोणते फळ आहे?’, ‘त्याचा रंग कोणता?’ आणि ‘तुम्हाला कोणते फळ आवडते?’ असे प्रश्न विचारले. चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत आपल्या आवडत्या फळांची नावे सांगितली.
फळांची चित्रे ओळखणे, त्यांचे रंग सांगणे, फळांचे नाव उच्चारणे तसेच आपल्या आवडत्या फळाबद्दल सांगणे अशा कृतींमधून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. यासोबतच फळे खाण्याचे महत्त्व, सकस आहार आणि आरोग्यदायी सवयी याबाबतही मुलांना सोप्या व खेळकर पद्धतीने माहिती देण्यात आली.
भुलाबाईच्या पारंपरिक उत्सवाला आनंददायी शिक्षणाची जोड मिळाल्याने चिमुकल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची भाषिक अभिव्यक्ती, निरीक्षणशक्ती, आकलनक्षमता तसेच रंग व फळांची ओळख विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘फळे खाऊ, निरोगी राहू!’ या संदेशाने उपक्रमाची सांगता करण्यात आली. पारंपरिक संस्कृती आणि बालशिक्षण यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या या उपक्रमाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी कौतुक केले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...