Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र सामान्य बातमी

उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते - जळगावात राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा विश्वास

ईश्वर रामदास महाजन 08 Oct 2026, 05:11 980 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:47 5 min read
🔧 साधने:
उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते    - जळगावात राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा विश्वास

जळगाव प्रतिनिधी

समाजमाध्यमे आणि रीलच्या जाळ्यात आजची नवी पिढी गुरफटलेली असून वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. हे पुस्तक वाचकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते, असा विश्वास राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला.

जळगावात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), मराठी भाषा विभाग आणि उत्तर महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी पार पडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी ते बोलत होते.पुण्याच्या ‘पेन पब्लिशिंग हाऊस’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते, तर अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. विचारमंचावर उत्तर महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघाचे संघटक डॉ. मिलिंद बागूल, उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे व प्रा. एन. जी. बावस्कर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता सतिश शिसोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी बापूराव पानपाटील, प्रा. मेघा बारी, प्रा. निकिता साेनवणे, ज्याेती वाघ-बाविस्कर, प्रा. शीतल चाैधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शिर्षक थेट काळजाला भिडते

‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तकाचे शिर्षक उत्कंठावर्धक आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यात केवळ ८४ व्यक्तीचित्रणेच लेखकाने का निवडली? हे एक काेडं आहे. ते त्यांच्या पुढील आवृत्तीत उलगडू शकते. वडीलांची इच्छा साहित्यसेवेच्या माध्यमातून आनंदा पाटील यांनी पूर्ण केल्याचे समाधान वाटते. अवतीभवती असलेल्या दीपस्तंभांची ओळख या पुस्तकातून हाेते, असे राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आवर्जून नमूद केले.

सकारात्मक संदेश देणारे पुस्तक

‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षकांनी संग्रही ठेवून वाचावं असे आहे. वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारी वैशाली झाल्टे, राजेश्री सुरवाडे, कॅरिबॅग निर्मूलन चळवळीत याेगदान देणाऱ्या शैलाताई सावंत, वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वसा चालवणारे भीमशाहीर प्रतापसिंग बाेदडे, दिलीप घाेडेस्वार यांच्यासह विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्यांवर लिहिलेले लेख अभ्यासपूर्ण आहेत. प्रत्येकाने वाचावं असे हे पुस्तक आहे, असे अनुसूचित जाती-जमाती आयाेगाचे माजी सदस्य किशाेर मेढे यांनी नमूद केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीसंत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईचा गोड सवाल; चिमुकल्यांनी सांगितले आवडीचे फळ!* पुढील बातमी →एचआयव्ही सह जगणाऱ्या महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी उल्लेखनीय कार्य; आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालय चा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार'

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!