संस्थाध्यक्ष मा.नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना पाठांतर वह्यांचे वाटप*

*संस्थाध्यक्ष मा.नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना पाठांतर वह्यांचे वाटप*
मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘पाठांतरातून प्रगती’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी विशेष २५० वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी कविता, पाढे, श्लोक, सुविचार, प्रश्नोत्तरे, व्याख्या तसेच विविध विषयांतील महत्त्वाची माहिती नियमितपणे पाठ करावी आणि ती वर्गासमोर आत्मविश्वासाने सादर करावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पाठांतराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय, स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ‘पाठांतर वही’ देण्यात आली असून त्यामध्ये दररोज केलेल्या पाठांतराची नोंद ठेवण्यात येणार आहे. पाठांतर केलेला भाग शिक्षकांकडून तपासला जाईल. उत्कृष्ट व नियमित पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सन्मान देऊन त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यात येणार आहे.
‘दररोज थोडे पाठांतर, अभ्यासात मोठी भरारी!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. पाठांतर हा केवळ परीक्षेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी केले असून मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी २५० वह्या उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘पाठांतराची सवय – अभ्यासाची गती – प्रगतीची नवी दिशा’ हा सकारात्मक संस्कार रुजविण्याचा शाळेचा मानस आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...