शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; सविता बोरसे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

अमळनेर प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्रीमती सविता बबनराव बोरसे (अहिरे मॅडम) यांना राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीमती सविता बोरसे यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत शिस्तप्रियता, विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता, संस्कारक्षम शिक्षण, सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्मिती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली.
त्या स्व. विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल, शिरूड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व संस्थात्मक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असून त्या पु. साने गुरुजी शिक्षक पतपेढी, अमळनेरच्या मानद सचिव म्हणून तसेच मराठा समाज महिला मंडळाच्या संचालिका म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षक संघटनेचे संभाजी पाटील, धरणगावच्या नगराध्यक्षा चौधरीताई, फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पाटील, राज्य अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, राज्य महिला प्रदेशाध्यक्षा प्रा. मंदाकिनी भामरे तसेच राज्य पदाधिकारी प्रमोदिनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सविता बोरसे यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील, सचिव प्रा. भरत सर, कार्यकारिणी सदस्य सुनील बाबा, राजेश पाटील, शिवाजी नथ्यू पाटील, प्रविण काटे, अशोक पाटील, डॉ. अनिल शिंदे, शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलताताई पाटील, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक जे. डी. सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत केलेल्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी ला...
डि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्...
अमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागा...
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...