Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

शैक्षणिक कार्याचा गौरव; वर्षा राजेश सोहिते यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ,समर्पित शैक्षणिक सेवा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातील योगदानाची दखल

ईश्वर रामदास महाजन 07 Oct 2026, 06:21 875 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:41 7 min read
🔧 साधने:
शैक्षणिक कार्याचा गौरव; वर्षा राजेश सोहिते यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’    ,समर्पित शैक्षणिक सेवा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातील योगदानाची दखल

अमळनेर प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, समर्पित सेवा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या योगदानाची दखल घेत कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेरच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा राजेश सोहिते यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले.

National Human Rights and Anti Corruption Social Justice Foundation, Government of India अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, भारत सरकार यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणे, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर करणे, शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन व प्रेरणा देणे तसेच शाळेमध्ये सकारात्मक, संस्कारक्षम, सुरक्षित आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सौ. वर्षा सोहिते यांनी केलेल्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली.

*“ हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे "*

या पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना सौ. वर्षा राजेश सोहिते यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मात्र, या सन्मानामागे माझे एकट्याचे प्रयत्न नसून अनेकांचे प्रेम, विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्य आहे. माझे कुटुंबीय, संस्थेचे अध्यक्ष व सचिव, माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन व सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. तसेच National Human Rights and anti corruption Social Justice Foundationआणि पुरस्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांची मी आभारी आहे या सर्वांप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर पुढील वाटचालीसाठी मिळालेली एक मोठी प्रेरणा आणि जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कार्य करण्याची नवी ऊर्जा या सन्मानातून मिळाली आहे.”

*विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देण्याचा संकल्प*

‘शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणारे प्रभावी साधन आहे,’ या विचाराने सौ. वर्षा सोहिते शैक्षणिक कार्याकडे पाहतात. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच संस्कार, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहे.

*“सन्मानातून वाढली जबाबदारी; कार्याची प्रेरणा झाली अधिक दृढ”*

आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे आपल्या कार्याची जबाबदारी आणखी वाढली असल्याची भावना व्यक्त करत सौ. वर्षा सोहिते यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सचिव, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

सौ. वर्षा राजेश सोहिते यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव तर आहेच; पण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या एका समर्पित शिक्षिकेच्या प्रयत्नांना मिळालेली प्रेरणादायी पावतीही आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीवाढदिवस विशेष : वडिलांच्या कर्तृत्वाला सलाम! , आण्णासाहेब प्रकाश वाघ — कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास पुढील बातमी →आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्री.फहीम पटेल

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!