आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्री.फहीम पटेल

जळगाव:येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था,वांद्रे (पूर्व) मुंबई यांचे वतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस संस्थेचे प्रशिक्षक श्री.फहिम पटेल यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ शिक्षक डॉ.अतुल इंगळे यांनी श्री.पटेल यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. आपल्या व्याख्यानात श्री.पटेल यांनी जीवनामध्ये आलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सदैव सजग असणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपत्ती निवारण करण्याचे कौशल्य अवगत असणे गरजेचे आहे आणि ही विविध कौशल्ये कशी संपादित करावीत याबद्दलची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. दुर्गम भागात स्ट्रेचर उपलब्ध नसेल तर आजारी व्यक्तीला नजिकच्या इस्पितळात नेण्यासाठी नेमके काय आणि कसे करावे,सर्पदंश झाल्यावर कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली.आकस्मिक लागलेल्या आगीला रोखण्यासाठी आग प्रतिरोधक सिलेंडर कसे वापरावे व त्याचे कौशल्य कसे संपादित करावे याबद्दल त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे समन्वयक प्रा.गुणवंत वंजारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अतुल इंगळे व आभार प्रदर्शन प्रा.राजेंद्र निकुंभ यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयंत इंगळे, प्रा.स्वप्ना पाटील, प्रा. राजेश साळुंखे, प्रा.मीनल पाटील, प्रा.सी.एन.बेंडाळे, प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
कलेचा रंग कलेचा रंग फिका होतोय; वाचनसंस्कृती हरवतेय! अतुल पे...