Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
खान्देश विशेष बातमी

जेन्झीने गांधींकडून निडरपणा घ्यावा , ज्येष्ठ कलावंत शंभू पाटील यांचे प्रतिपादन; नोबेल फाउंडेशन–सतपंथ प्रकल्पाच्या ‘जेन्झी आणि गांधी’ व्याख्यानात मार्गदर्शन

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 13:34 1.2K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:42 7 min read
🔧 साधने:
जेन्झीने गांधींकडून निडरपणा घ्यावा  ,  ज्येष्ठ कलावंत शंभू पाटील यांचे प्रतिपादन; नोबेल फाउंडेशन–सतपंथ प्रकल्पाच्या ‘जेन्झी आणि गांधी’ व्याख्यानात मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या जीवनातून आणि विचारांतून नवीन पिढीने अनेक गुण आत्मसात करण्याची गरज आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निडरपणा होय. तरुणांनी निडरपणे प्रश्न विचारावेत, कोणत्याही विषयाची चिकित्सा करून तथ्य शोधण्याचा प्रयत्न करावा आणि सत्याच्या मार्गावर ठामपणे उभे राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलावंत शंभू पाटील यांनी केले.

नोबेल फाउंडेशन व सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘जेन्झी आणि गांधी’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर विवेकानंद प्रतिष्ठानचे प्राध्यापक उमेश इंगळे , नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील तसेच प्रकल्पाचे समन्वयक रमेश पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना शंभू पाटील म्हणाले की, “गांधी हा केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे.” आपल्या जगण्याच्या विविध आयामांमध्ये आपल्याला वेळोवेळी गांधी विचार भेटत असतो. अन्यायाविरोधात उभे राहणे, सत्याचा आग्रह धरणे, अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करणे आणि निडरपणे प्रश्न विचारणे ही गांधी विचारांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने गांधींच्या जीवनाचा केवळ इतिहास म्हणून अभ्यास न करता त्यांच्या विचारांचा वर्तमान जीवनाशी संबंध जोडून पाहणे आवश्यक आहे.

नेपाळमधील जेन्झी आंदोलन आणि भारतातील जेन्झी आंदोलन यांचा संदर्भ देताना शंभू पाटील यांनी सांगितले की, दोन्ही ठिकाणी तरुणांचा सहभाग आणि असंतोष दिसून आला; मात्र आंदोलनाच्या प्रवाहात गांधी विचाराचा असलेला किंवा नसलेला प्रभाव हा महत्त्वाचा फरक ठरला. नेपाळमध्ये गांधी विचाराचा अभाव असल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर भारतातील तरुणांचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पुढे गेले, असे त्यांनी स्पष्ट केले.

“ज्या ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, अशा बलाढ्य सत्तेला महात्मा गांधींनी प्रश्न विचारण्याचे धाडस केले. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी सामान्य भारतीयांना एकत्र केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले. त्यामुळे आजच्या तरुणांनी गांधींकडून सर्वप्रथम निडरपणे सत्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा घ्यावी,” असेही शंभू पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जयदीप पाटील यांनी नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही भर दिला जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सामाजिक जाणीव, मूल्यशिक्षण आणि देशाच्या विचारपरंपरेचा अभ्यास करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. उमेश इंगळे यांनी नोबेल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांनी सहभागी होऊन त्यांना व्यापक स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल बावीसकर यांनी केले.

गांधी विचारातून तरुणाईला नवी दिशा

‘जेन्झी आणि गांधी’ या विषयाच्या माध्यमातून आधुनिक तरुणाईसमोरील प्रश्न, लोकशाहीतील तरुणांची भूमिका, सत्याचा शोध, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि अहिंसक मार्गाने परिवर्तन घडविण्याची शक्ती यावर कार्यक्रमातून प्रभावीपणे भाष्य करण्यात आले. गांधींचा निडरपणा, सत्याग्रह आणि अहिंसेचा विचार नव्या पिढीने आत्मसात केल्यास समाजात सकारात्मक आणि लोकशाही मूल्यांवर आधारित परिवर्तन घडू शकते, असा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमहसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद, पातरखेडे येथे केली पिकांची पाहणी अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश पुढील बातमी →शिवबांना डोक्यावर नाही, डोक्यात ठेवा!’; काव्यसंध्येतून गुंजन पाटलांचा समाजाला आरसा द्रौपदी, गांधारी आणि सीतेच्या प्रतिमेतून आजच्या समाजव्यवस्थेवर परखड भाष्य; अमळनेरातील काव्यसंध्येला रसिकांची तुडुंब गर्दी

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!