देवगाव-देवळीच्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये करुणा क्लबतर्फे वन्यजीव सप्ताहाचा जागर , अहिंसा जनजागृती, वक्तृत्व स्पर्धा व स्वच्छता अभियानातून विद्यार्थ्यांना निसर्ग-वन्यजीव संवर्धनाचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये करुणा क्लबच्या माध्यमातून १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्राणी-पक्ष्यांविषयी प्रेम आणि निसर्गाप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने सप्ताहात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताहाची आखणी करण्यात आली. करुणा शिक्षक आय. आर. महाजन व एच. ओ. माळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
अहिंसा जनजागृतीतून शांततेचा संदेश
१ ऑक्टोबर रोजी अहिंसा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना “हिंसा टाळूया, शांतता जपूया; अहिंसा, संयम आणि माणुसकीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया” असा संदेश देण्यात आला.
गांधी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व स्वच्छता अभियान
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी हर्षाली पाटील, नेहा पाटील, दिव्या चौधरी, गायत्री महाजन, जिविका बैसाणे व वैशाली पाटील यांनी ‘अहिंसा परमो धर्म’ तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
निसर्गकथेतून पर्यावरण संवर्धनाचा धडा
करुणा शिक्षक एच. ओ. माळी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत निसर्ग कथा सांगितल्या. करुणा क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, प्राणी-पक्षी आणि पर्यावरणाविषयी प्रेम व संवेदनशीलता निर्माण केली जाते. वृक्षसंवर्धन, जलसंधारण तसेच प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण यांचे महत्त्व विविध कथा, उपक्रम आणि कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
वन्यजीव संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने करुणा क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. वन्यजीवांचे संरक्षण, प्राणी-पक्ष्यांविषयी प्रेम आणि पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीवांचे निसर्गातील महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन करुणा शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले. स्काऊट शिक्षक एस. के. महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...