Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ रक्त, डोळे व दंत तपासणीसह विविध आरोग्य तपासण्या संपन्नसात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र विशेष बातमी

SNA SPARSH प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमळनेरमध्ये प्रशिक्षण , मुख्याध्यापक, केंद्र समन्वयक व विशेष शिक्षकांचा सहभाग; ऑनलाइन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 13:39 1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 4 min read
🔧 साधने:
SNA SPARSH प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमळनेरमध्ये प्रशिक्षण  ,  मुख्याध्यापक, केंद्र समन्वयक व विशेष शिक्षकांचा सहभाग; ऑनलाइन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी : गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने तालुक्यातील केंद्र समन्वयक, जिल्हा परिषद, नगरपरिषद व शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, IED तालुका समन्वयक तसेच विशेष शिक्षकांसाठी SNA SPARSH कार्यपद्धती हाताळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आय.एम.ए. हॉल, जी.एस. हायस्कूल, अमळनेर येथे पार पडले.

गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे व शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि.प. जळगाव येथील वरिष्ठ लेखा सहाय्यक पद्माकर वाणी यांनी एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून SNA SPARSH प्रणालीची ऑनलाइन प्रक्रिया, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष हाताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान प्रणालीमध्ये विविध प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करावयाच्या, ऑनलाइन पद्धतीने कामकाज करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी तसेच प्रणालीचा प्रभावी व अचूक वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. सहभागी अधिकारी व शिक्षकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसनही पद्माकर वाणी यांनी केले.

गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी प्रास्ताविकातून SNA SPARSH प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करताना मुख्याध्यापकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण विभागातील कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी अशा प्रशिक्षणांचे महत्त्व असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी केले, तर केंद्र समन्वयक किरण शिसोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका वरिष्ठ लेखा सहाय्यक विजय बारी, सर्व तंत्रस्नेही शिक्षक, साधन व्यक्ती, अपंग समावेशित तालुका समन्वयक तसेच विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणामुळे सहभागी अधिकारी व शिक्षकांना SNA SPARSH प्रणालीच्या प्रत्यक्ष वापराबाबत अधिक स्पष्टता मिळाली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीसेवा संकल्प अभियान अंतर्गत पथनाट्य सादरीकरण शिक्षण विभाग पाचोरा यांचा उपक्रम पुढील बातमी →आशा सेविका, गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अमळनेरमध्ये बैठक , पेन्शन, ग्रॅच्युटी, मानधनवाढीसह विविध मागण्यांवर चर्चा; मुंबई, नागपूर व दिल्लीतील आंदोलनाबाबत मार्गदर्शन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!