आशा सेविका, गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अमळनेरमध्ये बैठक , पेन्शन, ग्रॅच्युटी, मानधनवाढीसह विविध मागण्यांवर चर्चा; मुंबई, नागपूर व दिल्लीतील आंदोलनाबाबत मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी : आशा सेविका व गटप्रवर्तक भगिनींच्या प्रलंबित मागण्या आणि आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी इच्छापूर्ती गणपती मंदिर, अमळनेर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीत पेन्शन, ग्रॅच्युटी, सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, भाऊबीज, मानधनात भरीव वाढ तसेच सन २०२६-२७ च्या मंजूर PIP मधील कपात रद्द करणे यासह विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुंबई, नागपूर तसेच दिल्ली येथे प्रस्तावित आंदोलनाबाबत रामकृष्ण बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तसेच NRHM अंतर्गत १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
बैठक यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख श्रीमती सुनंदा पाटील यांच्यासह वंदना पाटील, उषा पाटील, मनिषा पाटील, अनिता जाधव आदींनी परिश्रम घेतले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...