जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा सन्मान! , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री तिरमलेची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
1 min read

जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा सन्मान! , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री तिरमलेची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Loading

जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा सन्मान!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री तिरमलेची शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

अमळनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदळी (केंद्र शहापूर) येथील माजी विद्यार्थिनी कु. भाग्यश्री महेंद्र तिरमले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भाग्यश्रीच्या यशामागे वर्गशिक्षक श्री. सुधीर शांताराम चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्री. शंकरराव बोरसे, विद्यार्थिनीचे पालक तसेच तांदळी ग्रामस्थांनी भाग्यश्रीचे मनःपूर्वक कौतुक करून तिच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीच्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित करणारी भर पडली आहे.

भाग्यश्री तिरमले हिने मिळविलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *