कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि अनुभवाचा गौरव! , सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा संदीप युनिव्हर्सिटीत सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना दिले यशस्वी कारकिर्दीचे प्रेरणादायी मार्गदर्शन
1 min read

कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि अनुभवाचा गौरव! , सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा संदीप युनिव्हर्सिटीत सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना दिले यशस्वी कारकिर्दीचे प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि अनुभवाचा गौरव!

सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांचा संदीप युनिव्हर्सिटीत सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना दिले यशस्वी कारकिर्दीचे प्रेरणादायी मार्गदर्शन

नाशिक प्रतिनिधी
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त उपअधीक्षक (डीवायएसपी) वासुदेव देसले यांचा सेवापूर्ती निमित्त संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथे आयोजित विशेष कार्यक्रमात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. पवन भालदारे यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी वासुदेव देसले यांनी संदीप युनिव्हर्सिटीच्या फॉरेन्सिक सायन्स विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव कथन केले. पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी आणि लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यासाचे नियोजन, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अनुभवातून अनेक प्रश्न विचारत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास संदीप फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्तीच्या निमित्ताने झालेला हा सन्मान सोहळा देसले यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव ठरला, तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *