साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेची लेखणी विषमता, अन्याय, अत्याचारा विरोधी – प्रा डॉ राहुल निकम
1 min read

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेची लेखणी विषमता, अन्याय, अत्याचारा विरोधी – प्रा डॉ राहुल निकम

Loading

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेची लेखणी विषमता, अन्याय, अत्याचारा विरोधी –
प्रा डॉ राहुल निकम

साम्यवाद, समाजवाद, आंबेडकरवाद,स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता, स्त्री अधिकार आधी प्रश्नावर जनतेला जागृत करण्याच्या हेतूने अण्णाभाऊंचे लेखन वास्तवादी होते. विद्रोही गीतातून कष्ट करणाऱ्यांना समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होण्याची त्यांनी हाक दिली.असे उद्गार प्रा डॉ राहुल निकम यांनी काढले ते वक्त्यांच्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. 1 ऑगस्ट २०२६ रोजी 100 वक्ते शाळांवर जाऊन अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर व्याख्यान देणार आहेत. याप्रसंगी प्रा अशोक पवार यांनी अण्णा भाऊंच्या जीवन कार्यावर तयार केलेले वाचन साहित्य सर्व उपस्थित वक्त्यांना देण्यात आले.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक अभ्यासक मा हरिचंद्र कढरे यांनी अण्णा भाऊंवर सुंदर पोवाडा सादर केला. युवा कल्याण कला मंचच्या दिशा संदा नशिव, भारती कोळी, माधुरी पाटील यांनी अण्णाभाऊंचे गीत सादर केले. आभार प्रदर्शन अजय भामरे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने वक्ते उपस्थित होते. विशेष उपस्थितांमध्ये गायत्री भदाणे, अनिता बोरसे, पल्लवी पाटील, शैला बैसाणे, रूपाली पाटील, अशोक बिऱ्हाडे,श्रीकांत चिखलोदकर, रूपाली भास्करराव पाटील, प्रा डॉ सुनील वाघमारे,बटू देवरे,चिंधु वानखेडे आशा महाजन, प्रा शीला पाटील, पद्मजा पाटील,अशोक रघुनाथ पाटील,नरेंद्र पाटील, संजय पाटील,गिरीश पाटील, भारती गाला, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *