आनंददायी शनिवार’ला श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची जोड; माध्यमिक विद्यालयात अवतार दिन उत्साहात
1 min read

आनंददायी शनिवार’ला श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची जोड; माध्यमिक विद्यालयात अवतार दिन उत्साहात

Loading

आनंददायी शनिवार’ला श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची जोड; माध्यमिक विद्यालयात अवतार दिन उत्साहात

विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार; अहिंसा, समता आणि सामाजिक बंधुभावाचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी : स्थानिक माध्यमिक विद्यालयात महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार असल्याने या सोहळ्याला ‘आनंददायी शनिवार’ (Joyful Saturday) या उपक्रमाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. इंशुलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी हर्षल नीलकंठ महाजन उर्फ सैंगराजबाबा बिडकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रंगला ‘आनंददायी शनिवार’

‘आनंददायी शनिवार’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे सैंगराजबाबा महानुभाव यांनी आपल्या रसाळ व प्रभावी भाषणातून श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा परिचय करून दिला. अहिंसा, समता आणि सामाजिक बंधुभाव या मूल्यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीचक्रधर स्वामींच्या लीळा व शिकवण आजच्या आधुनिक काळातही समाजाला कशा प्रकारे मार्गदर्शक ठरतात, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. डी. डी. इंशुलकर यांनी विद्यार्थ्यांनी श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. तसेच ‘आनंददायी शनिवार’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक व सर्जनशील विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य

हा दुहेरी सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री. पी. डी. पाटील, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती आर. ए. पाटील, श्री. डी. व्ही. देसले, लिपिक श्री. एल. व्ही. पाटील आणि शिपाई श्री. जी. टी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. डी. व्ही. देसले यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा संदेश आणि आनंददायी शनिवारचा उत्साह यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *