साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये ‘गुरुपौर्णिमा ‘ उत्साहात साजरी .
1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये ‘गुरुपौर्णिमा ‘ उत्साहात साजरी .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये ‘गुरुपौर्णिमा ‘ उत्साहात साजरी .

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 19 / 07/2026 वार बुधवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून बासरी वादक श्री . योगेश पाटील , संगीत शिक्षक श्री . तुषार पुराणिक व शिक्षक वृंद उपस्थित होते . मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री . दिलीप पाटील यांनी केले . श्री .मुकेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . विद्यार्थिनींकडून 8अ – जानवी पाटील , 8ब – कनक पाटील ,9अ – कल्याणी पाटील , 9ब – लीना पवार , 10अ – कल्याणी पाटील , 10ब – वैदर्भी पाटील यांनी आपले भाषणात गुरूंविषयी आदर व्यक्त केला प्रमुख पाहुणे श्री . योगेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रत्येक व्यक्तीने एक कला जोपासली पाहिजे तरच खरा आनंद जीवन जगताना होत असतो , भविष्यात तुम्ही संस्कारी व्यक्ती व्हावे असा संदेश दिला . अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी कवी कालिदास यांची कथा सांगितली व गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात याविषयी माहिती सांगितली तुम्ही भविष्यात एक सुजाण नागरिक बना व यशस्वी व्हा हीच आमच्यासाठी गुरुदक्षिणा राहील कार्यक्रमाच्या शेवटी बासरी वादक श्री .योगेश पाटील सर यांनी बासरीवर गीत वाजवून दाखविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटील व श्रावणी पाटील यांनी केले आभार पुनश्री चौधरी यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *