दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा रोटरी क्लब अमळनेरचा सेवाभावी उपक्रम , मानव सेवा केंद्र, वेले येथे ४० गाद्यांचे वाटप; समाजसेवेचा आदर्श ठरला उपक्रम
![]()
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा रोटरी क्लब अमळनेरचा सेवाभावी उपक्रम
मानव सेवा केंद्र, वेले येथे ४० गाद्यांचे वाटप; समाजसेवेचा आदर्श ठरला उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी :
समाजसेवेचा व मानवतेचा वसा जपत रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने मानव सेवा केंद्र, दिव्यांग प्रभू केंद्र, मु. वेले (ता. चोपडा) येथील आश्रमशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० गाद्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक आरामदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या निवास व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
गाद्यांचे वितरण होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. या सेवाभावी उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास वेले आश्रमशाळेचे प्रमुख, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच रोटरी क्लब अमळनेरचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील आणि प्रकल्प प्रमुख रोटे. विवेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या सेवाकार्यात रोटे. चेलाराम सैनानी, डॉ. राहुल मुठे, रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा, रोटे. पुनम कोचर, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. प्रतीक जैन, रोटे. आशिष चौधरी, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. रौनक संकलेचा यांच्यासह सर्व रोटेरियन सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गाद्यांचे वाटप झाल्यानंतर शाळा प्रशासनाने रोटरी क्लब अमळनेरच्या सेवाभावी कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. समाजातील गरजू, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी रोटरी क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, हा उपक्रमही त्याच सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी नमुना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सदर उपक्रमाची माहिती रोटरी क्लब अमळनेरचे पी.आर.ओ. रोटे. मकसूद बोहरी यांनी दिली.

