मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा
![]()
मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मोईज सैय्यद यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर येथील पक्ष कार्यालयात मोईज सैय्यद यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. मोईज सैय्यद यांच्या सोशल मीडियावरील कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, अमळनेर युवक शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, जितू भाऊ ठाकूर, विक्रांत पाटील, सचिन बाळू पाटील तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोईज सैय्यद यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

