अमळनेरात एक कोटींच्या नमो गार्डनचे भूमिपूजन नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- माजी आमदार शिरीष चौधरी
![]()
अमळनेरात एक कोटींच्या नमो गार्डनचे भूमिपूजन
नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- माजी आमदार शिरीष चौधरी
अमळनेर प्रतिनिधी: चांगल्या कामांना वेळ लागतो विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या मात्र आम्ही संयम ठेवून पाणी पुरवठा देखील तीन दिवसाआड नियमित सुरू केला आणि पहिलेच काम प्रभाग ८ मध्ये लहान मुलांपासून , तरुण , महिला व वृद्धांसाठी तब्बल एक कोटींचे तिरुपती बालाजी नमो गार्डन पासून विकास कामांना सुरुवात झाली आहे असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नमो गार्डन च्या भूमिपूजन प्रसंगी केले.
प्रभाग आठ मध्ये अत्याधुनिक , योगा हॉल , सुरक्षारक्षक खोली , वृद्धांना बसण्यासाठी शेड , बाक , ओपन जिम , कार्यक्रम घेण्यासाठी स्टेज , फिरण्यासाठी पाथ वे , लाईट व्यवस्था ,मुलांसाठी खेळणे , मध्यभागी तिरुपती बालाजीचा पुतळा अशा सुविधांसह तिरुपती बालाजी नमो गार्डन होत आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की , या प्रभागातील लोकांनी मोठ्या फरकाने अपूर्वा चौधरी व नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर याना निवडून दिल्याने तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विरोधक म्हणतात गार्डन ची गरज काय पण राजकीय क्षेत्रात मैदान अपूर्ण पडू लागल्याने नेत्यांना शांत करण्यासाठी नमो गार्डन होत आहे. विरोधकांना कामाने उत्तर दिले जाईल.
यावेळी लोकनियुक्त डॉ परीक्षित बाविस्कर म्हणाले की तिरुपती सोन्याचा देव आहे त्या नावाचे गार्डन इथे होत आहे म्हणजे सोन्यासारखा विकास होत आहे. घरात काम करणाऱ्या महिला , वृद्ध , नागरिक आणि मुलांना चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक वातावरण आणि खेळती हवा पाहिजे या गार्डन साठी ५ कोटींचे बक्षीस आहे तेही आपल्याला जिंकायचे आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , पी डी साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी , नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , बांधकाम सभापती साहेबराव पवार , शिक्षण सभापती नावेद शेख , पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील , आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील , शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील , गटनेते पंकज चौधरी , अपक्ष गटनेते महेश देशमुख , अनिल महाजन , श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, प्रा भरतसिंग परदेशी, दिपक चौगुले , बाळासाहेब संदांनशीव , सुरज परदेशी, मुन्ना शर्मा, पंकज भोई, मंगलाताई देसले, शहर प्रमुख भरत पवार, विलास कंखरे, युवासेनेचे राहुल कंजर हजर होते.



