संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची यशाला गवसणी ,A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक; ‘डिस्टिंक्शन’चा मान
1 min read

संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची यशाला गवसणी ,A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक; ‘डिस्टिंक्शन’चा मान

Loading

संसार सांभाळत सुवर्णा धनगर यांची यशाला गवसणी

A.N.M. Promotional (L.H.V.) परीक्षेत प्रथम क्रमांक; ‘डिस्टिंक्शन’चा मान

जळगाव प्रतिनिधी : घर-संसार, मुलाबाळांची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये समर्थपणे सांभाळत शिक्षणाची जिद्द कायम ठेवणाऱ्या सौ. सुवर्णा कौतिक धनगर यांनी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन, मुंबई अंतर्गत A.N.M. Promotional (L.H.V.) 2026-27 परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत ‘Distinction’ प्राप्त केले.

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यासासाठी वेळ देणे हे निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते, हे सुवर्णा धनगर यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

संसार, मुलांचे संगोपन आणि अभ्यास यांचा साधलेला समतोल त्यांच्या यशाचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘जबाबदाऱ्या असल्या तरी स्वप्नांना मर्यादा नसतात!’

सुवर्णा धनगर यांचे हे यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची शिखरे गाठता येतात, हा प्रेरणादायी संदेश त्यांच्या यशातून मिळतो.

सौ. सुवर्णा धनगर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐🏆
आपल्या या ‘Big Achievement’चा आम्हाला मनापासून अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *