ए.आय.तंत्रज्ञान अद्ययावत माहितीचा स्रोत*- लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन.
1 min read

ए.आय.तंत्रज्ञान अद्ययावत माहितीचा स्रोत*- लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन.

Loading

*ए.आय.तंत्रज्ञान अद्ययावत माहितीचा स्रोत*- लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांचे प्रतिपादन.
—————————————-
अमळनेर :- AISECT- HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *स्वर्गीय अजितदादा पवार* यांच्या जयंती निमित्त AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा हा २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सायंकाळी ५ ते ६ दरम्यान संपन्न झाला. प्रस्तुत समारंभाचे अध्यक्ष खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए नीरज अग्रवाल हे होते.
प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी,पूज्य साने गुरुजी,माजी उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यसम्राट आमदार अनिल पाटील, आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा,खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए.नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी.मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल,उपाध्यक्ष कमल कोचर,जेष्ठ संचालक हरी वाणी,प्रदीप अग्रवाल,विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे या सर्वांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये कार्यक्रमाचे अनुभव व विस्तृतपणे आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कार्याध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल,अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना बिनेश वर्मा म्हणाले की,बँकिंग,मेल पासवर्ड कुठे ही टाकू नका,AI च्या माध्यमातून INTERSHIP, प्रोजेक्ट आणण्याचा आमचा मानस आहे,सर्वांना AI वापरता आले पाहिजे,याशिवाय पर्याय नाही.
याप्रसंगी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जळगावचे प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव,खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पंडित पाटील,सह चिटणीस प्रा.व्ही.बी.मांटे, माहिती व तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटचे संचालिका डॉ.वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डेआदी उपस्थित होते
यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल दादा म्हणाले की, AI चा वापर आज काळाची गरज आहे,चाट जीपीटी च्या माध्यमातून माहिती मिळते,AI चा वापर जमले नाही तर आपण शेवटच्या क्रमांकावर असणार म्हणून प्रशासनात AI फार महत्वाचे आहे.यामुळे आपणास अद्ययावत ज्ञान व माहिती मिळते.आज उत्कृष्ट पद्धतीने AI चा उपयोग होणे आवश्यक आहे, खरे तर यशाचे गणित AI मुळे शक्य आहे आज CSR फंडातून अद्ययावत गाड्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता AI चे प्रशिक्षण घेतले पाहिजे, प्रशिक्षण ही एक प्रकारची सेवा असते त्यातून सामाजिक जवाबदारी घेण्याचे नैतिक बळ मिळते.म्हणून याचा लाभ आपण घेतला पाहिजे. शेतक-याच्या मुलांना या तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे,याकरिता आपण प्रयत्न करू यात.तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट शेती कशी करू शकतो या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.
*उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार*
1) प्रकाश बडगुजर (गलवाडे),
2) श्रीमती लिलाबाई ठाकूर (साळवे),
3) किशोर पाटील (गांधली),
4) बापूसाहेब देवरे
(वलवाडी उपनगर,धुळे),
5) शरद सोनवणे (धरणगाव).
उपरोक्त सर्व शेतक-यांना आदर्श कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच AI प्रशिक्षण घेणा-या प्रताप महाविद्यालयातील
*सहभागी विद्यार्थी*
1) जयश्री वासुदेव पाटील,
2) पूनम राहुल चौधरी,
3) हर्षल महेंद्र नेरकर,
4) कल्याणी कैलास बडगुजर,
5) फाल्गुनी आनंदा महाजन,
6) रिंकू अनिल साळी,
7) भूमिका रितेश जैन,
8) मयुरी किशोर पवार,
9) वैष्णवी विलास पाटील.
उपरोक्त सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा यावेळी पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी HAL कौशल्य रथचे प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले तर
दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.यावेळी प्राचार्य डॉ.एस.जे.शेख (अमळनेर), प्रा.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील, प्रा.शशिकांत सोनवणे, प्रा.आर सी सरवदे, डॉ.माधव भुसनर,प्रा धनंजय चौधरी,

प्रा.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे, प्रा.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर, डॉ.ज्ञानेश्वर मराठे, प्रा.नितेश कोचे,डॉ.अनिल झळके, डॉ.बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *