अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप
1 min read

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप

Loading

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप

अमळनेर प्रतिनिधी

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील वक्त्यांना वैचारिक दिशा देण्याच्या उद्देशाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वक्त्यांची विशेष कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता विठ्ठल नगर, पिंपळे रोड येथील ‘अभ्यासिका’ (सी/ओ प्रा. अशोक पवार) येथे होणार आहे.
“‘स्वअनुभवातून स्वशिक्षण, स्वशिक्षणातून क्रांतिकार्य आणि प्रेरणादायी साहित्यनिर्मिती'” या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेला अभिवादन करत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, प्रभावी वक्तृत्व, वैचारिक मांडणी आणि सामाजिक भान विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते व विचारवंत मा. चेतन जाधव सहभागी होत असून, ते अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्याचा आणि आजच्या सामाजिक परिस्थितीतील त्याच्या उपयुक्ततेचा सखोल उहापोह करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून सहभागी वक्त्यांना प्रभावी संवादकौशल्य, अभ्यासपूर्ण भाषणाची तयारी आणि समाजपरिवर्तनातील वक्तृत्वाची भूमिका याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यशाळेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे प्रा. अशोक पवार यांनी तयार केलेले अभ्यासपूर्ण वाचन साहित्य सर्व सहभागी वक्त्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे सहभागींच्या वैचारिक आणि अभ्यासात्मक तयारीला अधिक बळ मिळणार आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. डॉ. राहुल निकम, आयु. अशोक बि-हाडे, डॉ. बापूराव ठाकरे, श्री. दयाराम पाटील, आयु. अजय भामरे आणि श्री. संजय पाटील हे संयोजनाची धुरा सांभाळत असून, त्यांनी सर्व वक्ते, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी या ज्ञानसमृद्ध उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रम तपशील :

– दिनांक : सोमवार, २७ जुलै २०२६
– वेळ : सायंकाळी ४.३० वाजता
– स्थळ : “अभ्यासिका”, सी/ओ प्रा. अशोक पवार, २८, विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेर
– संपर्क : ९४२२२७८२५६

“आपली उपस्थिती हीच कार्यशाळेचे यश!” असा संदेश देत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांनी सर्व इच्छुकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *