विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन
1 min read

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन

Loading

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन

सोनवल त. बो (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जि. प. शाळा सोनवल त. बो येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शालेय दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात काढली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड नामघोषाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संत परंपरेचा संदेश दिला. विठ्ठल व रुक्मिणीचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या भक्तिभावाचे व शिस्तबद्ध सादरीकरणाचे कौतुक केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार दिगंबर नागलगावे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत SIR मॅपिंगचे महत्त्व पटवून दिले. येत्या दोन दिवसांत आवश्यक मॅपिंग पूर्ण करून गावातील कोणताही पात्र नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, तसेच भविष्यातील अडचणी व गैरसोय टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेबद्दल आदर, संस्कार, सामाजिक जाणीव, शिस्त, सामूहिक सहभाग आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या विशेष पसंतीस उतरला.

या दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, सहशिक्षिका जयश्री मॅडम, शाळेच्या स्वयंपाकी भगिनी, पालक तसेच ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आषाढी एकादशीचा हा सोहळा भक्तिमय, संस्कारमय आणि संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *