खा. शि.मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा 82 वा वर्धापन दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न…..
1 min read

खा. शि.मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा 82 वा वर्धापन दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न…..

Loading

खा. शि.मंडळ संचलित द्रौ.रा. कन्या शाळेचा 82 वा वर्धापन दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न…..

अमळनेर प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ.संचलित द्रौ.रा.कन्या शाळेचा 82 वा स्थापन दिवस ( वर्धापन दिन ) आगळ्या वेगळ्या अभिनव- पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी तिन प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित होते.या मध्ये खा.शि.मं.अध्यक्ष आणि त्याच सोबत या समारंभाचे अध्यक्ष म्हणुन श्री.विनोद जगदिश अग्रवाल , शाळेच्या माजी विद्यार्थीनीं सौ रोहिणी सुनिल देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते सौ शुंभागी निलेश राजपुत हे कार्यक्रमासाठी विशेष अतिथी मान्यवर उपस्थित होते.त्याच सोबत खा.शि.मं.उपाध्यक्षा ताईसो माधुरी पाटील ,उपाध्यक्ष कमलजी कोचर ,विश्वस्त ताईसो वसुंधरा लाडगे , संस्थेचे कार्याध्यक्ष सी ए निरजजी अग्रवाल , कार्येपाध्यक्ष व शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन ,खा.शि.मंडळाचे संचालक व जी एस चे चेअरमन श्री हरी आण्णा वाणी ,प्राथ शाळा चेअरमन श्री प्रदिप अग्रवाल ,श्री विवेक भांडारकर ,प्राचार्य प्रताप प्रा डाॕ.एच बी जाधव ,श्री विनोद भांडारकर , सहचिटणीस प्रा.व्ही बी मांटे ,मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी . मुख्याध्यापक प्रतिनिधी श्री व्हि एम पाटील ,प्रताप हाय मुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर ,शिक्षक – पालक संघ उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पवार ,पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , प्राथ मुख्याध्यापक श्री कैलास पाटील ,खा.शि.शिक्षक प्रतिनिधी श्री आर जे पाटील , श्री एस एम पवार , शिक्षक प्रतिनिधी सौ. पी पी जोशी हे प्रमुख अतिथी मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.सदर मान्यवरांच्या शुभहस्ते माॕ सरस्वती ,श्रीमंत प्रताप शेठजी ,प.पू.सानेगुरुजी ,श्रीमती
द्रौपदीबाई भांडारकर ,यांच्या प्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन व माल्यार्पण करुन वर्धापन दिना निमित्ताने केक कट करण्यात आला.त्यांच सोबत मान्यवंराच्या शुभहस्ते शाळेचे नामफलक असलेला आकर्षक कलाकृतीचा फलक फुंग्यांच्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात आला,या वेळी विद्यार्थीनींनी एकच जल्लोश करीत वर्धापन दिवस चिरायु होवो अश्या घोषना देऊन समस्त आकाश निदादून सोडले. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शालेय प्रार्थना घेऊन करण्यात आली.
त्यानंतर मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडमांनी २०२५-२६वर्षाचे अहवाल वाचन केले.प्रमुख पाहुण्यांचां ओळख परिचय श्री के पी सनेर व श्रीमती पी डी शेवाळे यांनी करुन दिला.यावेळीप्रमुख अतिथी यांनी विद्यार्थीनींना अनमोल उपयुक्त व प्रबोधनात्मक स्वरुपांचे मार्गदर्शन केले.या नंतर स्वलिखित
” फुलवात” 81 वा अंकाचे प्रकाशन मान्यवंराच्या हस्ते करण्यांत आले.
एस एस सी बोर्ड परीक्षेत प्राविण्य प्राप्त व प्रथम आलेल्या तसेच क्रीडा क्षैत्रात आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय स्तरांवर प्राविण्य प्राप्त खेळाडूचा सत्कांर स्मृती चिन्ह , सुवर्ण पदक ,व सन्मानपत्र , शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.सदरकार्यक्रमा निमित्ताने उपहार स्वरुपात चिवडा व पेढे विद्यार्थीनींना वाटण्यात आले.
.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर एस सोनवणे मॕडम व आभार श्री एस पी वाघ सर यांनी केले.
सदर कार्यक्रमांसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ
,बक्षिस समिती प्रमुख श्रीमती पी व्ही साबे, सौ व्ही जे पाटील व त्या सोबत सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृद यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *